साईड पट्टयाचे खोदकाम अंदाजपत्रका प्रमाणे न करता साईडपट्टयात माती मिश्रीत मुरूम टाकून साईड पट्टयाची दबाई!
सोनगीरीच्या पुलाजवळ रस्ता रुंदीकरणासाठी मातीचा वापर!
परंडा( भजनदास गुडे )गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या वारदवाडी ते परंडा काशीमबाग पर्यंतच्या रस्त्याचा ठेका धुळे येथिल देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला असुन सदर रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
ठेकेदार यांच्या कडून अंदाज पत्रकाप्रमाणे रस्त्याचे कम करण्यात येत नसुन थातूर मातूर काम करण्यात येत आहे.सोनगीरी नदी पुलाल गदच्या वळणावर रस्त्याचे रुंदीकर करण्यासाठी मातीचा वापर करण्यात आला आहे.या गंभीर बाबीकडे परंडा सार्वजनीक बांधकाम विभागा कडून दूर्लक्ष केले जात आसल्या मुळे प्रवाशातून आश्चर्य व्यक्त केल जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निकृष्ठ दर्जाचे होत असलेल्या कामाकडे जानीव पूर्वक दुर्लक्ष का?करीत आहेत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वाहनधारक व प्रवाशी नागरिकांतून होत आहे.
तसेच अंदाजपत्रका प्रमाणे रस्त्याची साईड पट्टयाची खोली ४९ सेंटीमीटर खोदकाम करून हार्ड मुरूम भरणे गरजेचे असताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईट पट्टीचे खोदकाम अंदाज पत्रकाप्रमाने न करता अपूर्ण खोदकाम करून माती मिश्रीत मुरूम टाकुन दबाई करण्यात येत आहे.
अंदाजपत्रका प्रमाणे रस्त्याचे काम करून घेण्याची जबाबदारी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची असताना त्यांच्या कडून दर्जाहीन होत असलेल्या रस्त्याच्या कामाकडे जानीव पुर्वक दुर्लक्ष होत आसल्याचे दिसत आहे.
रस्त्याचे काम अंदाज प्रत्रकानुसार न झाल्यास शासनाचे कोट्यावधी रुपये वाचा जाऊन काही वर्षात रस्ता पुन्हा खराब होऊन त्याचा वाहनधारक व प्रवाशाना त्रास सहन करावा लागनार आहे.
या रस्ता कामाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाची पाहणी करून अंदाजपत्रका प्रमाने काम करून घ्यावे अशी मागणी वाहाणधारक व प्रवाशी नागरीकातुन होत आहे.