दुधी ग्रामस्थांच्या वतीने सुपुत्र मेजर नागनाथ कवठे यांच्यावर पुष्पवृष्टी करत केले भव्य स्वागत
परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील दुधी येथिल सुपुत्र मेजर नागनाथ रामहरी कवठे हे आपली २६ वर्षांची सैनिकी देश सेवा पुर्ण करुन ३१ जानेवारी रोजी सैनिकी सेवेतुन सेवानिवृत्त झाले आहेत.
नागनाथ कवठे सैनिकी सेवेतुन सेवानिवृत झाल्या नंतर ते प्रथमच दुधी गावात आले आसता दुधी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्यावर पुष्पवृष्ठी करत भव्य सत्कार करून स्वागत केले व पुढिल आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
मेजर नागनाथ रामहरी कवठे यांची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची व हालाखीची होती.घरात कमालीची हालाखी असताना आशा हलाकीच्या परिस्थितीवर मात करून १ एप्रिल १९९८रोजी सीआपीएफ मध्ये भरती झाले.त्यावेळी दुधी गावात जास्त कोणी शिकलेले नसल्याने योग्य मार्गदर्शन देखील मिळणे कठीण होते,अशा परिस्थितीत गरिबीवर आणी अनेक संकटांवर मात करून ते भरती झाले,१ एप्रिल १९९८ रोजी त्यांनी सीआरपीएफ मध्ये जाॅईन होऊन सैनिकी सेवेला प्रारंभ केला.त्यांची ट्रेनिंग बडुच मध्यप्रदेश येथे झाली.त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग नागालॅंड येथे झाली तेथे त्यांनी ३ वर्ष देश सेवा केली.त्यानंतर बिहार व आसाम येथे प्रत्येकी ३ वर्ष देश सेवा केली.पुढे जम्मू आणि काश्मीर अशा दुर्गम भागात ५ वर्ष व छत्तीसगड सारख्या नक्षलवादी भागात ५ वर्ष देश सेवा केली.
तसेच आपल्या जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांनी नागपूर येथे ३ वर्ष व मुंबई येथे २ वर्ष देश सेवा करून ते ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले.
ग्रामस्थांच्या स्वागत सत्काराने भाराऊन गेलेले नागनाथ कवठे यांनी त्यांच्या २६ वर्षाच्या सैनिकी सेवेतील खडतर जिवन प्रवासा विषयी गावकऱ्यांना सांगताना त्यांचे डोळे पानावले होते.
सैनिकी सेवेत भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या युवकांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी गावातील देशसेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त झालेले मेजर बब्रुवान तुकाराम जाधव, बाबुशा लक्ष्मण जाधव,देशसेवेत सध्या कार्यरत कार्यरत मेजर मोहन काशिद या सुपुत्रांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी दुधी गावातील मुले, पुरुष,महिला,वयोववृध महीला, पुरुष,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.