उन्हाळी सुट्टी आणि पुढील शैक्षणिक वर्षाची (२०२३-२४) तारीख ठरली !

0
69

 


धाराशिव – सध्या राज्यातील अनेक शाळांमध्ये परीक्षांची तयारी सुरू असून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांचे वेध लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने उन्हाळी सुट्ट्या आणि पुढील शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

मंगळवार, दि. 02 मे 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. 11 जून 2023 पर्यंत ग्राह्य धरावा. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये दुसरा सोमवार, दि. 12 जून, 2023 रोजी शाळा सुरु करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. 26 जून, 2023 रोजी सुरु होतील.

 इ. 1 ली ते इ. 9 वी व इ.11 वी चा निकाल दि. 30 एप्रिल, 2023 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. तथापि, तो निकाल विद्यार्थी / पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.

शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करुन त्याएवेजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक निदेश आपले स्तरावरुन द्यावेत.

 माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण सुया 6 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here