back to top
Monday, September 16, 2024
Google search engine
Homeदेश-विदेश1 कोटी घरांच्या छतांवर सौर उर्जा यंत्रणा बसवण्याच्या उद्दिष्टासह “प्रधानमंत्री सूर्योदय योजना”...

1 कोटी घरांच्या छतांवर सौर उर्जा यंत्रणा बसवण्याच्या उद्दिष्टासह “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी करणे हा या योजनेचा उद्देश

मोठ्या प्रमाणात छतावर सौर ऊर्जा यंत्रणेचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश

अयोध्या येथे सूर्यवंशी भगवान श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आटोपून दिल्लीत परतल्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी, 1 कोटी घरांच्या  छतावर सौरऊर्जा यंत्रणा  बसवण्याच्या उद्देशाने “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. बैठकीदरम्यान पंतप्रधान म्हणाले की, यामुळे प्रत्येक घराला त्याच्या छतावर सूर्यप्रकाशाचा उपयोग करून त्यांचे वीज बिल कमी करता येईल आणि त्यांना त्यांच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवता येईल.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उद्देश अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवून त्याद्वारे  वीज उपलब्ध करून देणे आणि अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे हा  आहे.

मोठ्या प्रमाणात छतावर सौर ऊर्जा पॅनेलचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित  करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना मिळणार छतावरील सौर ऊर्जा यंत्रणा

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत 1 कोटी कुटुंबांना छतावरील सौर ऊर्जा यंत्रणा मिळणार आहे.

पंतप्रधान म्हणाले, “आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, देशातील जनतेच्या घराच्या छतावर स्वतःची सौर ऊर्जा यंत्रणा असावी, हा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे.

यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होण्याबरोबरच ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होईल.

एक्स पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणाले:

“जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्रीरामाच्या दर्शनातून नेहमीच ऊर्जा मिळते.

आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सौर ऊर्जा यंत्रणा असावी, हा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या  छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे.

यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरही  होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments