परंडा (प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील अनाळा येथे सालाबाद प्रमाणे दिवाळी निमित् भव्य आट्या – पाट्या स्पर्धेचे आयोजन कालिका देवी मैदानावर करण्यात आले होते.या स्पर्धा १०ते १२ नाव्हेंबर दरम्यान संपन्न झाली.या स्पर्धेसाठी गावातील उच्च शिक्षित तरुण,व्यापारी बांधव यांनी आकर्षक बक्षीसे स्पर्धेसाठी दिली होती.या स्पर्धेत ३२ संघांनी सहभाग नोंदवला होता.स्पर्धेचा समारोप दि.१२ रोजी संध्याकाळी झाला.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे २१००० हजार रुपयाचे बक्षीस शिवशाही आट्या – पाट्या संघ अनाळा यांनी पटकाविले.द्वितीय क्रमांक १५००० हजार रुपये संघर्ष आट्या – पाट्या संघ इनगोदा, तृतीय क्रमाक ११००० हजार जय भवानी आट्या – पाट्या संघ मुगांव,चतुर्थ क्रमांक ७००० हजर विठ्ठल – रुक्मिनी आट्या – पाट्या संघ पंढरपूर तर पाचवे बक्षीस ५००० हजार जय भवानी आट्या – पाट्या संघ साकत यांनी पटकाविले.
बक्षीसाचे वितरण डॉ. प्रकाश सरवदे,अभियंता सतिश चोबे, सोमनाथ गिलबिले कालिका ज्वेलर्स चे विनोद चिंतामणी, मेजर योगेश शिंदे,अंगद राऊत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.विजेत्या संघास सागर ज्वेलर्स तर्फे ट्रॉफी भेट देण्यात आली.तीन दिवस चालेल्या या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून अप्पा राजे वामन यांनी उत्कृष्ठ काम पाहिले.या स्पर्धेसाठी पंच म्हणून दशरथ क्षिरसागर,हनुमंत क्षिरसागर,सुग्रीव फराटे,बाबू कदम,लक्ष्मण पवणे,लक्ष्मण हिवरे,उमेश क्षिरसागर यांनी काम पाहिले.मैदान व्यवस्थापक म्हणून बाळू मोटे यांनी काम पाहीले स्पर्धा शांततेत संपन्न करण्यासाठी गावातील तरुण युवक,पोलीस दलात कार्यरत असणारे लक्ष्मण क्षिरसागर व रमेश क्षिरसागर यांनी अथक परिश्रम घेतले . स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती .