उस्मानाबाद –
जिल्हयात अवैध मद्य / मद्यार्क, मळी आयात, निर्यात, वाहतूक व विक्री करणान्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कार्यवाही करुन गुन्हे नोंदविण्याची मोहिम चालु आहे. गत दोन महिन्यापासून जिल्हयात विविध ठिकाणी सामूहीक धाड रात्र आयोजीत करुन अवैध मद्य निर्मीती केंद्रावार कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हयातील अधिकारी सतर्क राहून सदर मोहिमेत भरीव कामगीरी करीत आहेत. यातच 26 एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मौजे गोरोबाकाका चौक पारधीवस्ती तेर ता. जि. उस्मानाबाद येथील विजय विश्वंभर काळे, वय-20 वर्षे रा. गोरोबाकाका नगर तेर ता. जि. उस्मानाबाद व इतर हा मौजे तेर येथील बसस्टॅण्ड समोर त्याचे राहत्या घरात पारधी वस्ती गोरोबा काका चौक तेर ता. जि. उस्मानाबाद येथे त्यांचे फायदेसाठी अवैध रित्या गोवा राज्यनिर्मीत उत्पादन शुल्क चुकविलेले विदेशी दारुची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगुण असल्याची खात्रीलायक बातमी मीळाली नुसार गणेश बारगजे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क उस्मानाबाद, व्ही. पी. राठोड, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद, अमर कोरे, स.दु.नि. एम. पी. कंकाळ, स.दु.नि. आर. आर. गिरी. स.दु.नि.विशाल चव्हाण, विनोद हजारे अनिल, कोळी, बालाजी भंडारे, कोंडीबा देशमुखे अभिजीत बोंगाणे, सुरेश वाघमोडे, तुषार नेर्लेकर, अविनाश गवंडी, ऐजाज शेख व अनिल सोनकांबळे जवान यांचेसह गुप्त माहिती मिळालेल्या मौजे तेर येथील बसस्टॅण्ड समोर त्याचे आरोपीत इसमाच्या राहत्या घरात पारधी वस्ती गोरोबा काका चौक तेर ता.जि. उस्मानाबाद येथे प्रो. गुन्हेकामी छापा मारला असता आरोपी विजय विश्वभंर काळे, यांचे ताब्यातुन प्रो. गुन्हयाचा नमुद एकुण रु.632060/- रुपये किंमतीचा गोवाराज्यनिर्मीत उत्पादन शुल्क चुकविलेले विदेशी दारुची मद्याचा मुद्देमाल मिळून आला.
हा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून या गुन्हयात मिळून आलेला आरोपी व इतर यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65- (ड) (ई), 80 (1),8183 90 व 108 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरचा मद्यसाठा तो कोणला विक्री करणार होतो याचा तपास केला जात आहे.