तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप आघाडीला १४ जागा जिंकत पुन्हा सत्ता राखण्यात यश

0
88

 खासदार संजय काका पाटील यांच्या भाजप सह काँग्रेस, शिवसेना, आघाडीला फक्त चार जागा


राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील युवा नेते रोहित दादा पाटील व सुरेश भाऊ पाटील  यांचा करिष्मा कायम

तासगाव (राहुल कांबळे)

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार सुमनताई पाटील व रोहित दादा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकत बाजार समितीवर सत्ता कायम करण्यात यश मिळवले आहे तर खासदार संजय काका पाटील यांच्या भाजप काँग्रेस व शिवसेना या आघाडीला चार जागांवर समाधान मानावे लागले, यामध्ये भाजपला तीन जागा तर काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी बाजी मारली आहे.

रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक हे पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय येथे मतदान अत्यंत चुरशीने पार पडले चार वाजता मतदान पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता मुख्य प्रशासकीय इमारती येथे मतमोजणी प्रारंभ झाला सुरुवातीला तोलाईदार गटातून भाजपने आपले खाते खोलले होते सुरेश बेले ४२ मते मिळवून विजय झाले त्या पाठोपाठ व्यापारी गटाचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुचर्चित उमेदवार सुदाम शेठ लक्ष्मण माळी हे १२५ मते व विद्यमान संचालक भाजपचे कुमार शेठ रामचंद्र शेटे हे ९६ मते घेऊन विजय झाले, नंतर ग्रामपंचायत विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार विजयी झाले. महिला राखीव जागेवर फेर मतमोजणी घेण्यात आली त्यामध्ये रेखा रवींद्र पाटील या एकमताने विजय घोषित करण्यात आल्या, आर्थिक दुर्बल गट,ओबीसी गट,भटक्या विमुक्त गट,  व अनुसूचित जाती जमाती गट यातून चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले नंतर सोसायटी गटामध्ये मात्र चुरस पाहायला मिळाली यामध्ये काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष यांनी या निवडणुकीमध्ये आक्रमक प्रचार केला होता त्यांनी ४४२ मते घेत विजयश्री खेचण्यात यश मिळवले आहे. मतमोजणी अत्यंत चुरशीने सुरू असल्याने याकडे सर्व जिल्ह्यासहित मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले होते. मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप तसेच भाजप,काँग्रेस शिवसेना समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष करीत गुलालाची प्रचंड उधळण केली व फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला होता स्वामी रामानंद भारती सुतगिरणी येथे आमदार सुमनताईपाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा विजयाचे प्रमुख शिल्पकार सुरेश भाऊ पाटील हे देखील कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी झाले हे विशेष होय सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार तसेच आमदार सुमनताई पाटील,सुरेश भाऊ पाटील यांनी श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या पुतळ्याचा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, गेल्या निवडणुकीत बाजार समितीमध्ये भाजपला एक जागा मिळाली होती यावेळी तीन जागा तर काँग्रेसला महादेव नाना पाटील यांच्या रूपाने एक जागा मिळाली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वास तात्या पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन भैया तांबोळी, तासगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे, गटनेते बाळासाहेब सावंत, शहराध्यक्ष गजानन खुजट, प्रा. बटू पवार सर, माजी चेअरमन अमोल आबा पाटील, पतंग बापू पाटील, मोहन अण्णा पाटील, माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील, जि प सदस्य बंडूभाऊ पवार, संजय दादा पाटील, अभिजीत पाटील, खंडू कदम इत्यादी उपस्थित होते

गटनिहाय विजयी उमेदवार (कंसात त्यांना पडलेली मते आणि गट) :

सहकारी संस्था गट – 

संग्राम पाटील ४७६ (राष्ट्रवादी)

रवींद्र पाटील  ४७२ (राष्ट्रवादी)

दत्तात्रय थोरबोले ४६१ (शेकाप)

रामचंद्र जाधव ४६० (राष्ट्रवादी)

रामचंद्र पवार ४६० (राष्ट्रवादी)

अनिल पाटील ४६० (राष्ट्रवादी)

महादेव पाटील ४४२ (काँग्रेस,सर्वपक्षीय आघाडी-खासदार गट)

संस्था गट महिला राखीव-

विजया पाटील ४८१ (राष्ट्रवादी)

रेखा पाटील ४६३ (सर्वपक्षीय आघाडी/खासदार गट) (फेर मतमोजणी मध्ये १ मताने विजयी)

संस्था गट इतर मागास प्रवर्ग-

अंकुश माळी ४९६ (राष्ट्रवादी)

संस्था गट भटक्या विमुक्त जाती जमाती- 

मुकुंद ठोंबरे ४८५ (राष्ट्रवादी)

ग्रामपंचायत गट सर्वसाधारण –

सुनील(युवराज) पाटील ४२३ (राष्ट्रवादी)

अवधूत शिंदे ३९९ (राष्ट्रवादी)

ग्रामपंचायत गट अनुसूचित जाती जमाती- राजाराम पाखरे ३९८(राष्ट्रवादी)

ग्रामपंचायत गट आर्थिक दृष्ट्या दुर्बल- 

धनाजी पाटील ३९९ (राष्ट्रवादी)

अडते व्यापारी गट-

सुदामशेठ माळी १२५ (राष्ट्रवादी)

कुमारशेठ शेटे ९६ (खासदार गट )

हमाल तोलाईदार गट- 

सुरेश बेले ४२ (खासदार गट)

सर्व विजयी उमेदवारांचे आमदार सुमनताई पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील व युवा नेते रोहित दादा पाटील यांनी अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here