दहिफळ (योगराज पांचाळ)
कळंब तालुक्यातील सापनाई येथे सुरेश पाटील यांच्या शेतात नांगरणी चालू असताना आठ फुट लांब धामीण नांगराच्या फाळाला आडकली ती गंभीर जखमी झाली.शेतकरी पाटील यांनी सर्पमित्र अनंत माने यांना फोन करून सांगितले.घटनास्थळी येऊन धामीण पकडून तीला दहिफळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेहण्यात आले.आठ फुट लांब असणाऱ्या धामीणीवर प्रथमोपचार सेवक जगताप यांनी केले.
एका सापावर पहिल्यांदाच उपचार करण्यात आले आहेत.साप माणसाचा शत्रू नसुन मित्र आहे.शेतातील पिकाचे उंदरापासुन साप संरक्षण करतो.विनाकारण तो माणसाला चावत नाही.साप दिसला तर संपर्क करा असे आवाहन सर्पमित्र अनंत माने यांनी केले आहे. ९४०३७३४९२४ या नंबरवर संपर्क साधावा.