ईट चे सरपंच आसलकर यांचा समाजवादी पार्टीकडून सत्कार

0
83

ईट चे सरपंच आसलकर यांचा समाजवादी पार्टीकडून सत्कार
भूम प्रतिनिधी, ईट ग्रामपंचायतचे सरपंच संजय असलकर यांच्या ग्रामपंचायतीच्या भरीव कामाबद्दल समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव एड, रेवण( दादा) भोसले यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
भूम तालुक्यातील सर्वात मोठी ईट ग्रामपंचायत असल्याकारणाने या ग्रामपंचायतीचा मोठा कारभार आहे या गावच्या विकासासाठी सतत धडपड करत असलेले सरपंच संजय असलकर यांनी गावाचा विकास साधला असून विविध अंगी कामातून जनसेवा करत आहेत. असलकर हे गावात काम करत असताना कसलाही मानसन्मान न बाळगता ते कचरा गाडीवर चालक म्हणून देखील गावात रोज सकाळी दारोदारी फिरत असल्याचे दिसून आल्याने अड, भोसले यांनी असलेल्या कामाचे कौतुक करत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सत्कार केला. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भोसले तालुक्यातील अनेक गावात गाठीभेटी घेत असतानाही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भेट दिली व ग्रामपंचायतचे सरपंच संजय असलकर यांच्या चे कार्य पाहून त्यांनी ग्रामपंचायत कार्यालया मध्ये सत्कार केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सयाजी हुंबे माजी ग्रा.प. सदस्य दिलीप भोसले,इम्रान पठाण, बाबा थोरात, शरद चोरमले, दत्ता हुंबे, राजाभाऊ देशमुख आदी गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here