प्रतिनिधी (तुळजापूर) : महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटना व जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटना यांच्या वतीने जळगाव येथे ११ व्या वरीष्ठ राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने नेत्रदीपक कामगिरी करत चार रजतपदकासह चार कांस्यपदकांची कमाई केली.
दि. १९ ते २२ डिसेंबर २०२३ या कालावधीत ही स्पर्धा संपन्न झाली. यात राज्यातील मुलांच्या गटात ३५ जिल्ह्यातील तर मुलींच्या गटात ३० जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते.
यात धाराशिव जिल्ह्याकडून खेळताना मुलींच्या एकेरी स्पर्धेत प्रियांका किरण हंगरगेकर हिने रजतपदक पटकावले. तर मुलींच्या दुहेरी स्पर्धेत प्रियांका हंगरगेकर व प्रेरणा देशमुख यांनी कांस्यपदक प्राप्त केले. तसेच मुलींच्या सांघीक संघाला रजतपदक प्राप्त झाले.या संघात प्रियांका हंगरगेकर, प्रेरणा देशमुख, इश्वरी गंगणे, गार्गी पलंगे, शुभांगी नन्नवरे यांचा सहभाग होता.
मुलांच्या एकेरी स्पर्धेत स्वराज देशमुख यांने कांस्यपदक प्राप्त केले. मुलांच्या दुहेरी स्पर्धेत सुयश आडे व आदित्य सापते यांनी रजतपदक प्राप्त केले. दुहेरीमध्ये यशराज हुंडेकरी व संजय नागरे यांनी यांनी कांस्यपदक प्राप्त केले. तसेच मुलांच्या सांघीक संघाने कांस्यपदक पटकावले. या संघात स्वराज देशमुख, आदित्य सापते, यश हुंडेकरी, कृष्णा थिटे, करण खंडागळे, संजय नागरे, सुयश आडे यांची सहभाग होता.
मिश्र दुहेरीमध्ये प्रियांका हंगरगेकर व यश हुंडेकरी यांनी रजतपदक प्राप्त केले.या सर्व खेळाडूंचे महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुनिल पूर्णपात्रे, सचिव रविंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष संदीप गंगणे, जिल्हासचिव शिराज शेख, प्रशिक्षक संजय नागरे, प्रशिक्षक राहुल जाधव यांनी अभिनंदन केले.