back to top
Friday, December 6, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्या५५ हजार शिक्षकांची भरती लवकर करा, अभियोग्यता धारक उमेदवारांची मागणी

५५ हजार शिक्षकांची भरती लवकर करा, अभियोग्यता धारक उमेदवारांची मागणी

 



धाराशिव दि १८ (प्रतिनिधी) – ५५ हजार शिक्षकांची भरती करण्याची मागणी अभियोग्यता धारक उमेदवारांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे  केली आहे. २०२३ मधील  अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन जवळपास दोन महिने पूर्ण झाली आहेत पण अजूनही शिक्षक भरती संदर्भात प्रक्रिया सुरू झालेली नाही. या कारणामुळे डी एड व बी एड अभियोग्यता धारक विद्यार्थी नैराश्याकडे जात आहेत. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२३ अंतर्गत एकच टप्प्यात ५५ हजार पदासाठी शिक्षकाची भरती करून अभियोग्यता धारकास न्याय द्यावा. पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी पवित्र पोर्टलवर नाव नोंदणी करत असताना सर्व कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा देण्यात यावी, जाहिरातीतील सर्व प्रवर्गांना न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक प्रवर्गाच्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार जागा विभागातून द्याव्यात, निवड यादी सोबतच प्रतीक्षा यादी देखील लावण्यात यावी एकदा पवित्र पोर्टल मार्फत निवड होऊन नोकरी मिळालेल्या उमेदवारांना पुन्हा पवित्र पोर्टलवर प्राधान्य नोंदणी करण्याची संधी देऊ नये विभागीय भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये निवृत्त शिक्षकांची नियुक्ती न करता त्या ठिकाणी टीआयटी २०२३ मधून अभियोग्यता धारकांची नियुक्ती करण्यात यावी, पहिली ते पाचवी वर्गावर कार्यरत असलेल्या बारावी विज्ञान बीएससी पात्रता असलेल्या शिक्षकांना सहावी आठवीच्या वर्गावर गणित विज्ञान विषयासाठी नियमाबाह्य प्रस्ताव देण्यात आलेल्या पदोन्नती रद्द करावी, २०१७ मधील अपात्र गैरहजर व १९६ संस्थेच्या जागेची निवड यादी त्वरित लावण्यात यावी,या भरतीत मध्ये खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या ३८% जागा आणि डब्ल्यू एस प्रवर्गासाठी दहा टक्के जागा उपलब्ध करून द्याव्यात, २०२२-२३  संच मान्यता करताना विद्यार्थ्यांच्या आधारानुसार न करता सरळ पोर्टल नुसार करण्यात यावी,कर्नाटक मध्ये एसएटीएस नावांच साॅफ्टवेअर आहे. त्या आधारावर महाराष्ट्रात अशा प्रकारची साॅफ्टवेअर प्रणाली राबवावी या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अभियोग्यता धारक उमेदवारांनी दिला आहे. या निवेदनावर भिमराव कांबळे, जुई शहा, लखन कांबळे, आशपाक शेख, ओंकार गोळे,दिपक कोरे, राहुल सिरसट,किरण बोरकर, वैभव क्षिरसागर, हसन सय्यद, तानाजी शेंद्रे, विष्णू जाधवर, बाबूराव घोडके, सुदर्शन कांबळे, फरहीन इनामदार, अब्दुल सय्यद, जवेरीया नाज रईस, फौजीया पठाण, आसीया पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments