नव्या संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी

0
87

 


धाराशिव दि. २४ (प्रतिनिधी)- नव्या संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, २८ मे नव्या संसदेचे उद्घाटन रद्द करून २६ नोव्हेंबर संविधान दिनी करावी या मागणीसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  घोषणाबाजी करत आंदोलन केले. 

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यां मार्फत पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की, भारताची नवी संसद निर्माण झाली आहे. वर्षभरापासून अनेक आंदोलनातून संविधानवादी,मानवतावादी ,आंबेडकरवादी समूहाने मागणी केली की नव्या संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे.कसलीही मागणी नसताना तेलंगणा सरकारने सचिवालयाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन संविधानाचे अस्तित्व कायम केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणात बाबासाहेबांचे नाव घेतात परंतु संसदेला नाव का देत नाहीत ? तेलंगणा च्या धर्तीवर नव्या संसदेला नाव देऊन संविधान,भारत, संसदेचे अस्तित्व अस्मिता राखावी २८ मे ला संसदेचे उद्घाटन आहे हे सावरकर जयंतीचे औचित्य साधून केलेला पराक्रम आहे. संसदेचे उद्घाटन संविधानदिनी झाले पाहिजे त्यासाठी 26 नोव्हेंबर तारीख ऐतिहासिक तारीख आहे 28 मे चे उद्घाटन रद्द करून 26 नोव्हेंबरला करावे संसद ही भारतीय संविधानावर  चालणारी आहे धर्म सत्तेवर चालणारी नाही. नव्या संसदेला नाव देण्याचा लढा व्यापक करून देशव्यापी केला जाईल वेळ आल्यास दिल्लीला सुद्धा आंदोलन छेडणार असा इशारा ऑल इंडिया पॅंथर  सेनेच्या वतीने देण्यात आले आहे. या निवेदनावर जिल्हाधक्ष धनंजय हुंबे, अशोक कसबे, यशपाल गायकवाड, भैय्यासाहेब वाघमारे, अजय माने, सुशांत सुकाळे,समाधान लगाडे,मुकेश सोनवणे, शहाजी सुकाळे, शरद कसबे, संजय अडयुडे, विशाल कसबे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here