उस्मानाबाद, दि. ५ प्रतिनिधी – नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे गटनेते नळे यांच्यात ओएफसी केबलवरुन चांगीलच खडाजंगी झाली दोघेही एकमेकांच्या जागेवर उठुन जोरजोरात बोलत असल्याने सभागृहात काही काळ तणाव होता.
सभेची सुरुवात नगरसेवक अभय इंगळे यांनी मांडलेल्या विषयाने झाली. शहरातील बागांमध्ये झाडे लावली जात आहेत. बागांना कंपाऊंड वॉल करुन झाडे लावण्याच्या ठराव झाला असल्याची त्यांनी आठवण करुन दिली. मात्र शहरात बागांना तारेचे कंपाऊंड बसवले जात आहे. एकएक फुटांवर झाडांची लागवड सुरु आहे. नागरिकांना बागेचा आनंद घेता येणार नाही. असे इंगळे यांचे म्हणणे होते. मात्र बागांना बांधकाम करुन कंपाऊंड वॉल करता येत नाही. किती अंतरावर झाडे लावायची याबाबत शासनाचे धोरण आहे. त्यानुसार झाडे लावत असल्याचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितले, यावर नगरसेवक माणिक बनसोडे यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध करा असे सांगितले. यावर नगराध्यक्षांनी तुमच्या आमदारांना शासनाच्या धोरणाबाबत विधानसभेत विषय मांडायला सांगा म्हटल्यानंतर हा विषय थांबला.
सभेमध्ये लेखा विभागासाठी टॅली सॉफ्टवेअर बनवुन सनदी लेखापालची नेमणुक करणे, नागरिकांच्या तक्रारीसाठी नगरपालिकेचे ऍप बनवणे, आधारवर आधारित बायोमेट्रीक प्रणाली उपकरण खरेदी, मलनिस्सारण केंद्रासाठी सर्व्है नं ६६१,६६२,६६८ चा भाग खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करणे, डीजीपे अंकाऊंट उघडणे, अग्निशामन वाहन खरेदी आदी विषयांच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली.
साहित्य संमेलनासाठी ठराव
आखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे व्हावे अशा मागणीचा ठराव सर्वसाधारण सभेत घेवुन मंडळाकडे पाठवण्यात येणार आहे.
अल्पसंख्यांकासाठी नविन डीपीआर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या योजनेनुसार शहरातील अल्पसंख्यांकाच्या स्तर उंचावण्यासाठी, अल्पसंख्याक वस्तीमध्ये जागा शोधुन त्याच्या डीपीआरच्या प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये अल्पसंख्यांकासाठी उद्योग प्रशिक्षण, बाजार, शाळा, मच्छीमार्केट, यापैकी एक उपक्रम आखता येणार आहे.
नगरपालिकेच्या सभेत वृक्षलागवड, ओएफसी केबलवरुन खडाजंगी
RELATED ARTICLES