कोल्हापूर जिल्ह्यात झाला रक्ताचा तुटवडा, रक्तसंकल नच थंडावले

0
149

महापुरामुळे बसला फटका डेंग्यू सह अन्य रुग्णांची ससेहोलपट, रक्‍तासाठी नातेवाईकांची होते धावपळ…

निकीती निकम:- पाचगाव
       महापुरामुळे गेले महिनाभर कोल्हापूर जिल्ह्यात रक्तदान शिबिरच न झाल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्तपेढीत रक्ताचा ठणठणाट झाल्‍याने रुग्णालयातून मागणी झाली तर रक्त द्यायचे कोठून असा पेच आहे. त्यात पावसाने उघडीप दिल्याने डेंग्‍युसह इतर साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने रक्ताविना रुग्णांची ससेहोलपट होत आहे.
             कोल्हापूर जिल्ह्यात रक्तदात्यांची संख्या मोठी आहे सण,समारंभ, वाढदिवसापासून ,निमित्त मिळेल त्यावेळी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.  एखादी आपत्ती आली तरी मदतीसाठी सर्वात पुढे कोल्हापूर करच असतात .त्यामुळे कोल्हापूरकरांची रक्ताची गरज भागवून इतर जिल्ह्यांना रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो .पण  महापुरामुळे रक्तदान शिबिरे होऊअपेक्षीत अशी होऊ शकलेली नाहीत .महापुराच्‍या कालावधीत आठ-दहा दिवस सगळेच व्यवहार ठप्प होते
             ऑगस्ट महिन्यात वर्षभरातील उच्चांकी रक्त संकलन होते १५ ऑगस्टला तर बहुतांश ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते पण यंदा ते होऊ शकले नाही त्याचा परिणामही रक्तसंकलनावर झाला आहे महापूर ओसरल्याने सगळीकडे दुर्गंधी, घाण पहावयास मिळत आहे घाणीमुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालय तुडुंब झालेली दिसतात डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे त्यांना बाहेरून रक्त व रक्त घटकांची गरज लागते पण रक्तपेढ्यांमध्ये ठणठणाटअसल्याने त्यांना वेळेत रक्तपुरवठा होत नाही……
          चौकट
प्‍लेटलेटस्‌ची मागणी जास्‍त वाढली ..
         डेंग्‍युमूळे रोज ४० हून अधिक रक्त पिशव्यांची मागणी जास्त प्रमाणात होत आहे यामध्‍ये प्‍लेटलेटस्‌ची मागणी अधिक आहे विशेष म्हणजे प्‍लेटलेटस्‌चे आयुष्य केवळ पाच दिवस असल्याने त्यांची साठवणूक करता येत ना…
       *ही रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे…
 रक्‍ताची गरज आणि उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे .त्यामुळे रुग्णांसाठी रक्तदात्यांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन ऐच्‍छीक रक्तदान करावे त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था ,तरुण मंडळांनी, स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरजूंना रक्तदान करून सामाजिक कार्याला हातभार लावावा…
         –  स्‍वराज्‍य मित्र मंडळ कोल्‍हापूर. 
  अध्‍यक्ष :-अभिजीत पोवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here