सुरेश पाटलांना मिळणार राष्ट्रवादीची उमेदवारी?

0
84
 उस्मानाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसची उस्मानाबाद- कळंब जागेची उमेदवारी एस.पी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांना मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर ई.डी. ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी सुरेश पाटील यांनी राष्ट्रवादी- काँग्रेस-आरपीआय आघाडीचा गमजा घातला होता. सुरेश पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश करून मोजकेच दिवस झाले आहेत.   त्यांच्याकडे आघाडीच्या प्रचाराचा गमजा दिसल्याने त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. काल मुंबईत इच्छुक उमेदवारांना बोलावण्यात आले होते. मुंबईहून येताना सुरेश पाटील प्रचार साहीत्य घेऊन आल्याचे बोलले जात आहे.मात्र अद्याप पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर न केल्याने उमेदवारी कोणाला मिळणार हे गुलदस्त्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here