उस्मानाबादेत तृतीयपंथीयांसाठी बनले पहीले स्वच्छतागृह

0
110
उस्मानाबाद  – येथील न्यायालयाच्या परिसरात नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे तृतीयपंथीयांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

स्वच्छतागृह म्हटले की, स्त्रीयांसाठी वेगळे आणि पुरूषांसाठी वेगळे असे दोन प्रकार आहेत. मात्र तृतीयपंथीयांसाठी वेगळे स्वच्छतागृह बांधण्याची ही पहीलीच वेळ आहे. भारतात तृतीयपंथीयांसाठीचे पहीले स्वच्छतागृह २ ऑक्टोबर २०१७ साली भोपाळ येथे बांधण्यात आले होते.
उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातील कोणत्याच शासकीय कार्यालयाच्या आवारात तृतीयपंथीयांसाठी स्वच्छतागृहाची सोय नाही मात्र न्यायालयात ही सोय झाल्याने तृतीयपंथीयांसाठी एका अर्थाने ‘सामाजिक न्याय’ मिळाल्याची भावना आहे. मात्र अद्याप हे स्वच्छतागृह वापरासाठी खुले करण्यात आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here