धाराशिव – आम आदमी पार्टीच्या वतीने धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकार आणि दिल्ली राज्य सरकार यांच्यादरम्यान प्रशासकीय अधिकार ताब्यात घेण्यावरून संघर्ष सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिलासा दिल्यानंतरही केंद्र सरकारने अध्यादेश काढून तो निर्णय बदलला. याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अध्यादेशाला राज्यसभेत विरोध करण्यासाठी विरोधीपक्षातील अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीशकुमार, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेत्यांची त्यांनी भेट घेतली आहे.