तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील 10 रुग्ण गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातून आलेल्या सर्वांची तपासणी चालू असून त्यामधून 25 जणांचे अहवाल आज शुक्रवारी दुपारी निगेटिव्ह आले असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. तर नऊ जणांचे अहवाल अद्यापही प्राप्त झाले नसल्याचेही ते म्हणाले. सोलापुरात आज नव्याने कोणताही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही किंवा त्याच्या संख्येत वाढ झाली नाही. मात्र जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींवर सिविल हॉस्पिटल मध्ये तपासणी सुरू असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
सोलापूर च्या सिविल हॉस्पिटल मधील आयसोलेशन वार्ड मध्ये 494 जणांचे टेस्ट आज अखेर झाली आहे . त्यापैकी 485 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 473 जणांचा कोरोना निगेटिव अहवाल आला आहे . तर बारा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत . त्यामध्ये या आधीच एक तेलंगी पाछा पेठ येथील किराणा दुकानदार मृत झाला आहे. मृत किराणा दुकानदाराच्या संपर्कातील एक व्यक्ती व खाजगी हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या महिलेच्या संपर्कातील नऊ व्यक्ती असे एकूण दहा नवीन कोरोना रुग्ण गुरुवारी दुपारी आढळल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केले होते. सोलापूर जिल्ह्यात कोरणा पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या बारा इतकी झाली आहे या आधी एक किराणा दुकानदार मयत झाला असून 11 कोरूना पॉझिटिव रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी दुपारी 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर नऊ जणांचे अहवाल वेटिंग वर आहेत. आज अखेर कोणताही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरू नये आपल्या घरातच बसावे व जिल्हा प्रशासन पोलिस प्रशासन व आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.
Home महाराष्ट्र 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह, नऊ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती