सोलापूर – शहरातील कुमठा नाका इंदिरानगर परिसरातील 69 वर्षीय एका महिलेचा कोरोना आजाराने मृत्यू झाला असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दुपारी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली. सदरची महिला कोरोना बाधित आढळली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्या महिलेचे निधन झाले असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. सोलापूर शहरात कोरोना आजाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या दोन इतकी झाली आहे तर अद्यापि 13 कोरोना पॉझिटिव रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
. .. सोलापूर शहरातील तेलंगी पछा पेठ येथील एक किराणा दुकानदार सुरुवातीस कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता मात्र त्याचा अहवाल येण्याआधीच तो मृत झाला होता. आता किराणा दुकानदाराच्या मृत्यूनंतर इंदिरा नगर कुमठा नाका परिसरातील एका महिलेचाही कोरोना बाधित उपचाराने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. . सोलापुरात कोरोना बाधित तेरा रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसोलेशन वार्डात उपचार घेत आहेत. यापैकी 12 रुग्ण पाच्छा पेठ येथील आहेत, तर एक रुग्णांना रविवार पेठ जोशी गल्ली येथील आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात 718 व्यक्ती ऍडमिट होते त्यापैकी 504 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 490 व्यक्ती या कोरोना निगेटिव्ह आढळल्या आहेत व आतापर्यंत 15 व्यक्ती या कोरोना पॉझिटिव आढळले आहेत. यापैकी दोन पेशंट मृत झाले आहेत. कुमठा नाका इंदिरानगर परिसर शनिवारी रात्रीच्या सुमारास सिल करण्यात आला आहे. महापालिकेचे आरोग्य पथक ही इंदिरानगर परिसरात जाऊन घरोघरी तपासणी करत आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या संपर्कातील आठ व्यक्तींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आल्याचे सांगितले आहे. इतर व्यक्तींचाही शोध ही परिसरात सुरू आहे.