उस्मानाबाद दि.१(प्रतिनीधी)
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे वतीने ६०व्या महाराषट्र दिनी, हीरक महोत्सवी वर्षानिमित्त कोरोनापासून सूरक्षित राहण्यासाठी दोन हजार मास्कचे वाटप केले आहे.
लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा संपत आला आसातांनाही व राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आसतांनाही उस्मानाबाद शहरात आजही अनेक जण मास्क न वापरता शहरात फिरतांना दिसत असल्याने आशांना महाविद्यालयाच्या वतीने मास्क वाटप करण्याच्या भूमिकेतून
आज महाविद्यालयात, प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियोजन करून महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक यांना मास्कचे वाटप केले .
व सध्या उस्मानाबाद शहरातील विविध भागातील रस्त्यावर व गल्लीमध्ये अनेक जण तोंडाला मास्क न लावता फिरत आहेत.त्यामुळे महाविद्यालयातील शिक्षकांनी ,रस्त्यावर मास्क न लावता फिरणा —याला व आपण राहात असलेल्या परिसरातील नागरिकांना मास्क वाटप करण्याचे आवाहन केले.सदर दोन हजार मास्क महाविद्यालय व महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक,अभ्यासकेंद्राच्या वतीने नियोजन केले होते.
आज महाराषट्र दिनानिमित्त महाविद्यालयातील संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे पुतळा परिसरात सोशल डिस्टन्सचे आंतर ठेवून कर्मचारी यांना मास्कचे वाटप प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रा.डी.एम.शिंदे,उपप्राचार्य प्रा.बबन सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी शहरातील विविध भागात शिक्षकांनी मास्कचे वाटप करावे म्हणून शिक्षकांना मास्क देण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयातील शिक्षकांनी महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावरून ये जा करणारे,व बार्शी नाका,शाहुनगर,सांजा रोड,शिक्षक काॅलनी या ठिकाणी मास्कचे वाटप केले आहे.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या वतीने दोन हजार मास्कचे वाटप
RELATED ARTICLES