महाराष्ट्रातील पत्रकारांचा ५० लाख रकमेचा विमा उतरवावा आ.सुमनताई पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
92

तासगाव – ( राहुल कांबळे)
सध्या भारत देशाचे महाराष्ट्रात व प्रमुख मुंबई येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात या विषाणूने थैमान घातले आहे. आपले महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्याप्रकारे काम करीत आहेत या महामारी विरोधात पूर्ण ताकदीनिशी मुकाबला करीत आहेत या आजाराशी लढा देण्यासाठी झटणारे पोलीस डॉक्टर नर्सेस व आशा वर्कर्स व संबंधित त्या धर्तीवर घटकांचा केंद्र शासन ५० लाख रुपये रकमेचा विमा उतरवला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन अंगणवाडी सेविका यांचा २५ लाख रकमेचा विमा उतरण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आम्ही अभिनंदन तसेच लॉक डाऊन  काळात पोलीस डॉक्टर नर्स त्यांच्याबरोबर  संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार बांधव त्यामध्ये प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया आघाडीवर असल्याने आपणास घरबसल्या टीव्ही व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या देशातील आपल्या राज्यातील व आपल्या भागातील इतंभूत माहिती मिळत आहे. मुंबई येथे कोरोना संदर्भात माहिती मिळवण्या साठी पत्रकार बांधव कार्यरत आहेत.त्यातच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे ५० पत्रकार बांधवांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुंबई येथे उपचार सुरू आहेत ते सर्वजण सुखरूप आहेत त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात पत्रकार बांधव जीवाची पर्वा न करता जनतेच्या हितासाठी जनजागृतीच्या माध्यमातून आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत आहेत आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्याला प्राधान्य देत आहेत म्हणून या पत्राद्वारे महाराष्ट्र सरकारचे प्रमुख म्हणून आपल्याकडे या पत्राद्वारे आग्रही मागणी करीत आहे.  संपूर्ण राज्यातील पत्रकार बांधवांचा ५० लाख रुपये रकमेचा महाराष्ट्र शासनाने विमा उतरवावा अशी आग्रही मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्राचे लोकनेते माजी उपमुख्यमंत्री तथा  गृहमंत्री स्व. आर. आर. आबा पाटील यांनी सदैव महाराष्ट्रात आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात  जनतेच्या हिताचे कामे केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील दुष्काळी जनता, शिक्षक ,पोलीस प्रशासन इत्यादींच्या बाबतीत सकारात्मक विचार केला होता त्यांचे अकाली निधनानंतर आज राज्याच्या राजकारणात कधी नव्हे एवढी पोकळी निर्माण झाल्याचे राजकीय विश्लेषक आपले मत व्यक्त करीत आहेत अशातच स्व.आबांच्या पत्नी तासगाव कवठेमहांकाळ च्या लोकप्रिय आमदार श्रीमती सुमन ताई आर. पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांचा ५० लाख रु. रकमेचा विमा उतरवावा अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केल्याने स्व आबांच्या पश्चात आमदार सुमन ताई पाटील या त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. तरी या रास्त व आग्रही मागणीचा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे साहेब यांनी याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेतील अशी तमाम महाराष्ट्रातील पत्रकारांची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here