धाराशिव – १२ हजाराची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून या कारवाई नंतर पोलिस विभागातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. याबाबत वृत्त असे की गुटखा व तंबाखूचा व्यवसाय सुरू करू देणे कामी व तक्रारदारावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी महादेव वसंतराव शिंदे ,वय- 45 वर्षे, पद- पोलीस हवालदार, उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन, उस्मानाबाद(वर्ग 3) तक्रारदार यांचेकडून 15,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 12,000 रुपये लाच रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्य करून पंच साक्षीदारा समक्ष स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.