उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे दि.03 जुलै पर्यंत यात्रे निमित्त होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तपासणी.
सोलापूर प्रतिनिधी :- आषाढी एकादशी म्हणजे हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. त्यामुळे आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरीमध्ये येणा-या लाखो भाविकांना पिण्याचे आरोग्यदायी म्हणजे शुद्ध पाणी मिळावे व त्यांचे जलजन्य आजारांपासुन संरक्षण व्हावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत दि.१९ जुन ते ०३जुलै या कालावधीसाठी ही प्रयोगशाळा कार्यरत असणार आहे. या प्रयोगशाळेमध्ये शहरातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या,जलशुध्दीकरण केंद्रातील ,मंदिर परिसरातील ,बस स्थानक,रेल्वे स्थानक व जवळपास ६५ एक्कर,वाळवंट व शहरातील विविध भागातील पाणी नमुने दिवसातुन दोन वेळा तपासन्यासाठी पाठवण्यात येत आहेत. पाणी नमुने विहित वेळेवर पाठवण्याचे काम गाळणी निरीक्षक पा.पु केंद्र.जाधव व न.प .आरोग्य विभाग रवी पवार हे कार्यतत्परतेने करत आहेत.
दि.२३ जुनअखेर एकुण ३८४ पाणी नमुने तपासणीसाठी प्राप्त झाले आहेत.त्यापैकी २८६ नमुन्यांची तपासणी पुर्ण झाली असुन सर्व नमुने पिण्यास योग्य आढळुन आले आहेत.
दि. २३ जुन रोजी मा.उपसंचालक, आरोग्य सेवा,राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे विनोद फाले यांनी वरिष्ठ वैज्ञानीक अधिकारी रसिका ङोंगरे यांच्यासमवेत सकाळी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा सौलापुर व दुपारच्या सत्रामध्ये पंढरपुर प्रयोगशाळेस व जलशुध्दीकरण केंद्रास भेट देऊन संपुर्ण कामाची पाहणी करुन संबधितांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. सदर प्रयोगशाळेमध्ये जिल्ह्याबाहेरुन प्रतिनियुक्त केलेले फिरोज पठाण,सांगली हे प्रयोगशाळा प्रमुख, महेश चौधरी,ठाणे,सचिन दोङके बीङ हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणुन व शब्बीर मकानदार प्रयोगशाळा सहाय्यक काम पाहत आहेत. या सोबत उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर चे वैद्यकिय अधिक्षक डॉ. माने व कुलकर्णी सिस्टर यांचे सहकार्य लाभत असल्याचे फिरोज पठाण यांनी आवर्जुन सांगितले.