खासदार संजयकाका पाटील यांचे पुढाकाराने आणि प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या तासगांव येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन कोव्हिड केअर सेंटर येथून काल रात्री पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
डॉ. विजय जाधव आणि त्यांचे सर्व डॉक्टर सहकारी व पॅरामेडिकलच्या टीम यांचे अथक प्रयत्नातून सदर पेशंट कोरोनामुक्त झाला.
सदर पेशंटचा स्वॅब काल रात्री निगेटिव्ह आल्यानंतर शासनाच्या नियमांनुसार सर्व कारवाई करून पेशंटला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे, डॉ. विजय जाधव, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. विद्याधर कांबळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील, नगरपालिकेचे अधिकारी आणि कोव्हिड सेंटरचे समन्वयक प्रताप घाटगे, माजी नगरसेवक भोला मानकर यांचे उपस्थितीत पेशंटना पुष्पगुच्छ देवून त्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्याच आठवड्यात जनतेच्या सेवेत सदरचे कोविड हॉस्पिटल कार्यरत करण्यात आले होते सुरुवातीलाच एक दोन दिवसात डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्या थोडासा गैरसमज निर्माण झाला होता तो आता पूर्णपणे संपला असून तासगाव शहरातील प्रसिद्ध डॉक्टर डॉ विजय जाधव व त्यांची संपूर्ण शहरातील डॉक्टरांची टीम कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असून त्याचाच परिपाक म्हणून पहिला पेशंट पूर्णपणे पूर्ण मुक्त होऊन आपल्या घरी आपल्या कुटुंबांमध्ये परतला आहे. आज डॉक्टरांची टीम नुसते डॉक्टर बसून ते देव माणूस बनूनघ रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. या सर्व डॉक्टरांच्या टीमच्या हातून हे सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत व आपला तालुका व तासगाव शहर लवकरच या सर्व आजारावर मात करेल अशी अपेक्षा व्यक्त करूया.
Home महाराष्ट्र तासगांव येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे उभारण्यात आलेल्या कोव्हिड केअर हॉस्पिटलमधून...