परंडा पोलिस पथकाने टोळीचा पर्दाफाश,लाखो रुपये किंमतीच्या गोळ्या जप्त
परंडा ( दि १ जुलै )गर्भपात व सेक्सच्या गोळयांची अवैध खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा परंडा पोलिस पथकानी पर्दाफाश करून आरोपीच्या ताब्यातून लाखो रुपये किंमीतीच्या गोळ्या जप्त करून दोन आरोपी विरूध्द दि ३० रोजी परंडा पोलीस स्टेशनला गुन्हा गुन्हा दाखल करुन बार्शी येथिल आकाश ढोबळे या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, परंडा शहरात भृणहत्या व गर्भपातच्या गोळ्या एमटीपी किट व सेक्सच्या गोळ्याची अवैध विक्री करण्यासाठी बार्शी येथील लोक येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने परंडा पोलिस पथकाने व अन्न व औषध विभागाचे निरिक्षक श्रीकांत पाटील यांनी परंडा बस स्थानक रोड वरील रमाई चौकात सापळा लावला होता.
या प्रकरणातील आरोपी कार मधून औषध साठा घेऊन विक्री करण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास परंडा येथिल एस.टी स्टॅन्ड रोडच्या रमाई चौकात येताच पोलिस पथकाने छापा मारून कारची तपासणी केली असता औषधसाठा दिसुन आला.
आरोपीकडे औषधे खरीदीच्या पावत्या नसल्यामुळे आरोपीस ताब्यात घेऊन कार मधील गर्भपात करणारे एमटीपी किट व सेक्सच्या लाखो रुपये किमतीच्या गोळ्यां पोलिस पथकानी जप्त केल्या आहेत.
यातील आरोपी चॉकलेट, गोळ्या, बिस्कीट विक्रीच्या आडून औषधाची अवैध विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.अन्न व औषध विभागाचे निरिक्षक श्रीकांत पाटील यांच्या फिर्यादी वरून दोन आरोपी विरूध्द विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन बार्शी येथिल सुभाष नगर येथिल अकाश अविनाश ढोबळे यास अटक करण्यात आली आहे.
यातील आरोपी उस्मानाबाद व सोलापूर जिल्हयातील अनेक गावात गर्भपाताची व सेक्सच्या औषधाची अवैध विक्री करत असल्याचे समजते.परंडा शहरात गेल्या अनेक वर्षा पासून हा गोरख धंदा सुरू असुन परंडा येथे या औषधाची खरेदी कोणते दुकानदार खरेदी करत होते याचा देखील तपास करण्यात येणार आहे. पोलिस निरिक्षक अमोद भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरिक्षक कवीता मुसळे,पोकॉ योगेश यादव,चालक पोकॉ कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे करीत असुन तपास कामी त्यांना पो.ना बी.आर काकडे,पोकॉ एस एम कोळेकर, पोकॉ रफीक मुलाणी, पोकॉ योगेश यादव सहकार्य करीत आहे.