लोहारा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

0
85

   

मुलीवर लातूर मध्ये उपचार सुरू

तालुक्यातील एका खेडेगावात नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी या मुलीवर पाळत ठेऊन अत्याचार करण्यात आला त्यानंतर पीडितेची प्रकृती खालावली . तिच्या पालकांनी तिला स्पर्श ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .  त्यावेळी तिच्या आई – वडिलांनी उलट्या , जुलाब होत असल्याचे सांगितले . परंतु , डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली . त्यात तिने चौघांनी अत्याचार केल्याचे सांगितले . याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर पीडितेला पुढील उपचार व तपासणीसाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . याबाबत पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन यांना संपर्क साधला असता त्यांनी, महिला सपोनी तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या आहेत काल देखील त्या गेल्या होत्या मात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी एफ आय आर नोंदवली नसल्याचे सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here