पुणे विधानपरिषद शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२०.
* मित्रानो अन्यायाची चीड,न्यायाची चाड असणारा नेता निवडा
*शिक्षक आमदारांनी महाराष्ट्रातील शिक्षकानकडून कोट्यावधी रुपय गोळा केली त्या आमदारांच्या क्लिपा आल्या आहेत.त्यांना मतदान होणार का ?
शिक्षक आमदाराने व सरकारने शिक्षकाना लुबाडले.
गेले आठ दिवस आम्ही शिक्षक मतदाना वर सगळ्या बाजूनी लिहितोय त्याला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय काही नवीन प्रश्न हि समोर आले.भयाण परिस्थिती आहे.ज्या शिक्षकाच्या जीवावर देश उभा करणारी पिढी तयार करण्याची जबाबदारी आहे तेच शिक्षक किती अडचणीत आहेत हे जाणवले ते अचंबित करणारे आहे.
शिक्षक आमदार कामासाठी पैसे गोळा करतात हे आता झाकून राहिले नाही.आणि तरीही निर्लज्यासारखे पुन्हा निवडणुकीला उभा राहिले असतील पण आज हे पैसे देऊन मते मिळवतील निवडूनही येतील आणि पुन्हा शिक्षकाना वेठीस धरून पैसे उकळतील.या चोरापासून सावध राहा.
जुनी पेन्शन परत मिळवून देतो म्हणून खर्चासाठी वर्गणी गोळा केले,अनुदान देतो म्हणून संस्थांकडून पैसे घेतले.हे असे चालणार काय ?या विषयी कोणी बोलत नाही.
शिक्षक अमदारासाठी मतदान करत असताना त्याने पाच जिल्ह्यांतील शिक्षक ,पालक व विध्यार्थी यांच्या समस्या सोडवण्यासाठी आधुनिक माध्यमातून संपर्क ठेऊन काम केले पाहिजे.या शिक्षक आमदारांनी शासनाशी मान्येज होऊन शिक्षकानचा कर्दनकाळ बनू नये.प्रशासकीय अधिकार्याचे एजंटगिरी,आमदार निधीतून पुस्तके राद्धीच्या किमतीत आणून कमिशन खाणारा ,जातीभेद करून संघटनेत भांडणे लावणारा नसावा, शिक्षकनच्या पतसंस्था,सोसायट्या,बँका यांच्यात भाडणे लावून पोळी भाजणार नसावा.
मित्रानो अन्यायाची चीड,न्यायाची चाड ! विध्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यात निर्माण करण्यासाठी भारतरत्न धोंडो केशव कर्वे,कर्मवीर भाऊराव पाटील,कै.गोपाळ गणेश आगरकर,कै.पंजाबराव देशमुख,कै.बापुजी साळुंखे,कै.संत गाडगेबाबा,कै.जगदाळे मामा,या थोर शिक्षण महर्षींची परंपरा लाभलेला हा महाराष्ट्र याची जणीव असुद्या.
अनेक संस्था मध्ये स्वता अध्यक्ष ,पत्नी उप अध्यक्ष,मेव्हणी सचिव आणि हेच झाले शिक्षकनचे मालक.हे दृश्य भयावह आहे.शिक्षण क्षेत्र हे अत्यंत पवित्र असून या ठिकाणी शिक्षणाचा बाजार मांडलेल्या या बजबज पुरीला वाचवायचे असेल तर पक्ष विरहीत शिक्षक निवडणुका झाल्या पाहिजेत.तरच शिक्षकाला प्रतिष्ठा पुन्हा एकदा प्राप्त होईल.