विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
सद्गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या कृपाशीर्वादाने सांगली, सातारा,सोलापूर ,पुणे जिल्ह्यातील शेतकरी राजाला वरदायिनी ठरलेल्या सद्गुरु श्री श्री सा.का.लि. श्री श्रीनगर राजेवाडी या कारखान्याने बळीराजाच्या भवितव्याचा विचार करून चालू वर्षी ऊस उत्पादकांच्या आग्रहास्तव कारखान्याच्या विस्तारीकरणाचा अवलंब करून नवीन बॉयलर अग्नीप्रदीपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस मनोज कापरे गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली चेअरमन शेषागिरी राव,बाळासाहेब कर्णवर पाटील व सर्व संचालक मंडळाचे मार्गदर्शनाने जनरल मॅनेजर व सर्व खातेप्रमुखांच्या वतीने संचालक श्री व सौ सतीश दडस यांचे हस्ते धार्मिक व विधीयुक्त पूजेने कार्यक्रमाचा सद्गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सांगोला अर्बन बँकेचे चेअरमन एस के माळी, संचालक शहाजी नलावडे, सुरेश माळी, रामचंद्र जाधव, शिवदास गायकवाड,संजय फडतरे, तानाजी पवार या मान्यवरांच्या हस्ते चेअरमन एन शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, संचालक श्रावण दादा वाकसे यांच्या समवेत बॉयलर अग्नि प्रदीपन शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. सदर प्रसंगी डी.जी.एम. शहाजी पाटील, केन मॅनेजर सुनील सावंत,चीफ इंजिनियर महंतेश लोकनवार, प्रोजेक्ट मॅनेजर सूर्यतेज नारा, एच आर व ॲडमिन मॅनेजर समीर सय्यद, डेप्युटी चीफ इंजिनियर तानाजी देवकते, सिव्हिल इंजिनियर अवधूत जमदाडे,डिस्टलरी मॅनेजर लालासाहेब पाटील, डेप्युटी इलेक्ट्रिक इंजिनीयर श्री कट्टी, वामने साहेब, चीफ अकौंटंट बी. के.वाडेकर,व्ही.एस. गुंजवटे,एच आर व एडमिन चे सचिन खटके, शेती अधिकारी शरद देवकर,दत्ता क्षीरसागर सचिन मुंडफणे,आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक राजेंद्र वाघमारे,सुरक्षा अधिकारी श्री बोडरे उपस्थित होते. सांगोला अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने कारखाना कामकाजाचे कौतुक करून सद्गुरु कारखान्यास हवे ते सहकार्य देण्याचे मान्य केले.