जत:प्रतिनिधी:जत तालुक्यातील रेवनाळ ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच धनाजी पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.शुक्रवार दि.१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.यामध्ये १६ मतांची आघाडी घेत सरपंच पाटील यांनी अविश्वास ठराव जिंकला. विजयानंतर जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार विक्रमदादा सावंत व पदाधिकाऱ्यांनी सरपंच पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की,रेवनाळ ग्रामपंचायतची निवडणूक २०१७मध्ये झाली.त्यावेळी धनाजी पाटील यांचा लोकनियुक्त सरपंच म्हणून विजय झाला होता. त्यांच्या गटाचे ४ सदस्य निवडून आले. गावाचा कारभार चांगला चालला होता.मात्र गावातील भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांनी सरपंचाच्या गटातील सदस्यांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले.त्यामुळे अविश्वास ठराव डिसेंबर 2020 मध्ये पारित केला.हा ठराव जिल्हा अधिकारी यांच्या कडे पाठवण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी परत लोकनियुक्त सरपंचाच्या पदाविषयीचा निर्णय गावातील जनतेने मतदान प्रक्रिया घेऊन करावा असे आदेश दिले. त्याप्रमाणे दि.१ जानेवारी २०२१ ला निवडणूक घेण्यात आली. गावातील नागरिकांनी मतदान केले.त्यामध्ये परत विद्यमान सरपंच धनाजी पाटील १६ मतांनी आघाडी घेऊन निवडून आले.
यामुळे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले. गावातील काही माजी जि.प. व पं.स.सदस्य आणि ग्रामपंचायत ९ सदस्य इतके मातब्बर नेते असताना राष्ट्रीय काँग्रेस च्या कार्यकर्त्यानी मोठी ताकत लावली. विद्यमान सरपंचांच्या बाजूने कौल दिला. या निवडणुकीत काँग्रेसची ताकत जनतेने दाखवून दिली. यामुळे तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर याचा चांगला परिणाम होणार असल्याची भावना काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.
यावेळी सरपंच धनाजी पाटील यांचा जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार विक्रमदादा सावंत , जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
जत तालुक्यात ३० ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे.या पार्श्वभूमीवर रेवनाळ येथील सरपंच धनाजी पाटील यांनी अविश्वास ठराव जिंकला.यामुळे तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा हा निकाल असल्याचे चित्र असून रेवणाळच्या या राजकीय घडामोडीत माजी सभापती बाबासाहेब कोडग हे किंगमेकर ठरले आहेत.नवीन वर्षात कोडग यांनी काँग्रेसला न्यू इयर गिफ्ट दिल्याचे बोलले जात आहे.