विश्वजीत गोरड/पिलिव प्रतिनिधी : सोलापूर- सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरील माण- माळशिरस तालुक्याच्या मध्यावर माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी हे सधन गाव असून या गावातील वयोवृद्ध, तरुण व सर्वसमावेशक घटकांनी एकत्र येऊन गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून आदर्श निर्माण केला. त्या आनंदाप्रीत्यर्थ माजी सरपंच नानासाहेब कर्णवर पाटील यांनी कर्णवर पाटील परिवारातर्फे नूतन बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान ,त्यांचे वडील आबाजी कर्णवर पाटील यांच्या १११ व्या वाढदिवसाचे व मुलगा सद्गुरू श्री श्री साखर कारखाना लिमिटेड राजेवाडी श्री श्रीनगर चे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या आजोबां- नातूं च्या औक्षणाच्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नुकताच वाढदिवस झालेले सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरी राव यांना निमंत्रित केले होते .त्याच वेळी तालुक्यातील जुन्या पिढीतील,नव्या पिढीतील सर्व जेष्ठ,श्रेष्ठ मंडळींच्या उपस्थितीत वाढदिवसाचा आनंद घेत औक्षणाचा कार्यक्रम आनंदात पार पाडीत. १११ वयाच्या पित्याकडून बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा व पत्रकार दिनाचे महत्त्व ओळखून तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करून नवनिर्वाचित सदस्यांना आशीर्वाद देऊन मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन ए.पी.आय. सोमनाथ कर्णवर, अजित बापू कर्णवर , शामराव कर्णवर,सचिन कर्णवर व अतुल आवाड यांनी केले तर आभार पै.गणेश कर्णवर यांनी मानले. गोरडवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे उत्सवमूर्तींचे नातू ए.पी.आय सोमनाथ कर्णवर यांनी ५१ हजार रुपये गावच्या विकासासाठी दिले.