ईट-(प्रतिनिधी)ईट येथे विठ्ठल सोनबा चव्हाण यांची अज्ञाताने दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली . ही घटना ईट जातेगाव रोडवर ईरीकेशन कॉलनी जवळील आंबरईत घडली. सदर घटनेमुळे ईट परिसर हादरला असून मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे .तसेच नागरिकातून वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 22 ते 23 जानेवारी च्या राञी अज्ञात मारेकर्यां कडून दगडांनी विठ्ठल चव्हाण यांचे तोंडावर दगड मारून हत्या करण्यात आली . प्रकरणाच्या तपासासाठी डॉग स्काॅडला पाचारण करण्यात आले होते. तसेच घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.