कुर्डुवाडी दि.३०(प्रतिनिधी)
साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या वतीने सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळयाची आयोजन बैठक विठ्ठल मंदिर कुर्डुवाडी(ता.माढा) येथे करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष उमेश पाटील यांनी दैनिक जनमतशी बोलताना दिली
दरवर्षीप्रमाणे यंदा महाराष्ट्रात सर्वात मोठा शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा निर्धार कुर्डुवाडी शहरातील सर्व शिवभक्तांनी घेतला आहे याची पूर्व तयारी म्हणून आज सायं ६ वाजता कुर्डुवाडी शहरातील सर्व शिवभक्तांची आयोजित बैठकीत उपस्थित राहण्याचे आव्हान पाटील यांनी केले
यामध्ये रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबीर,शस्त्रास्त्र प्रदर्शन,रांगोळी स्पर्धा,शिव आरती,महिलांसाठी विविध उपक्रम,तसेच शिवरायांची पालखी असे विविध सामाजिक उपक्रमांचे याहीवर्षी त्याचप्रमाणे कुर्डुवाडी शहरात शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे.