back to top
Saturday, October 12, 2024
Google search engine
Homeसोलापूरबचेरी ग्रामपंचायत मध्ये शेतकरी विकास पॅनेल व परशुराम आघाडीची महायुती करुन सत्तास्थापन

बचेरी ग्रामपंचायत मध्ये शेतकरी विकास पॅनेल व परशुराम आघाडीची महायुती करुन सत्तास्थापन

विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-

बचेरी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवड शांततेत पार पडली असुन निकाल धक्कादायक पाहावयास मिळाला. परशुराम आघाडीने 8-3 असा विजश्री खेचुन आणला होता परंतु आतंर्गत कुरघोडीला कंटाळून मंगेश पाटील मोहन शिकारे महादेव बरकडे हे तीन सदस्य बाजुला झाले व त्यांनी शेतकरी विकास आघाडीच्या राणीताई विश्वजीत गोरड जयवंत भिसे शालन माने या तीन सदस्य याबरोबर युती करुन सत्तेचा सारीपाट रचला. यावेळी शेतकरी विकास आघाडीच्या सदस्यांनी पदवीधर सदस्य मंगेश पाटील यांना सरपंच पदी विराजमान केले तर उपसरपंच पदी विकासप्रिय जेष्ठ सदस्य मोहन शिकारे यांची उपसरपंच पदी निवड केली. धनगर समाजाचे चार सदस्य लिंगायत समाजाचा एक सदस्य मराठा समाजाचा एक सदस्य असे संख्याबल असुन सुद्धा लिंगायत व मराठा समाजाला खुर्ची देवुन धनगर समाजाने मनाचा मोठेपणा दाखवून सर्व धर्मसमभाव जोपासला याचे पिलीव पंचक्रोशीतुन कौतुक होत आहे. सर्व सदस्य सुशिक्षित असल्यामुळे रखडलेल्या कामाला गती मिळेल यात तिळमात्र सुद्धा शंका नाही. हे विकासप्रिय युवक एकत्र आणण्यासाठी प्रा. शंकर शिंदे सर माजी सरपंच लक्ष्मन तात्या गोरड माजी सरपंच सोमनाथ गाढवे बिराभाय शिंदे दिलीप माने गणेश काका गोडसे आप्पासाहेब बरकडे गोविंद शिंदे माजी उपसरपंच सुदाम शिंदे धुळा ठेंगल संभाजी सर्जेराव शिंदे ज्ञानेश्वर माने बाळु शिंदे मुकादम यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments