back to top
Saturday, October 12, 2024
Google search engine
Homeसोलापूरआजोबांनी केला अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार; नात्याला काळीमा फासणारी घटना

आजोबांनी केला अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार; नात्याला काळीमा फासणारी घटना

 

करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील  एका गावात 65 वर्षे आजोबांनी नातीवर घरात घुसून जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे करमाळा तालुक्यात या घटनेने माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 याबाबतची हकीकत अशी की आजोबाने आपल्या सख्ख्या चुलत भावाच्या एका अल्पवयीन नातीवर घरात एकटे असताना प्रवेश करून जबरदस्तीने बलात्कार केला आहे त्यानंतर घरात आई-वडिलांना सांगू नकोस नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे नातीने हा  प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितलं नाही ही घटना उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेला सुट्टी असल्याने ती घरात असताना घडली आहे दरम्यान मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईला आलेल्या संशयावरून पीडित मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने आजोबांनी जबरदस्तीने अनेक वेळा बलात्कार केल्याचे सांगितले यावेळी मुलीच्या आईने पती सह पोलीस स्टेशन गाठले व पोलिसांना सर्व प्रकार सांगितला दरम्यान पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली आहे.आजोबा नातीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने मात्र करमाळा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments