आरोपी विरूद्ध परंडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल,आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी
गर्दीच्या ठिकाणी चोरीची घटना व्यापारी वर्गात भितीचे वातावरण
चोरांना पकडून देणारे नागरिक |
परंडा ( दि ५ ऑगस्ट) दुकान बंद करून घराकडे निघालेल्या गणेश ज्वेलर्सचे व्यापारी यांची सोने चांदी दागिन्याची बॅग लुटल्याची घटणा दि.४ ऑगष्ट रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास परंडा बस स्थानक समोर घडली आहे.यातील आरोपी पळून जात असताना नागरीकांनी एका आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तर दुसरा आरोपी पळून जान्यात यशस्वी ठरला आहे.
या बाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की गणेश ज्वेलर्स दुकानाचे मालक गणेश कवटे राहणार रुई ता. परंडा हे दि ४ ऑगष्ट रोजी संध्याकाळी ६-३० वाजेच्या सुमारास दुकान बंद करून गावातील ग्राहकाना दाखवीण्या साठी बॅग मध्ये सोने व चांदीचे काही दागीने घेऊन मोटार सायकल वरून जात असताना एस.टी स्टॅन्ड समोर आल्यावर एका चोराने कवटे यांच्या मोटार सायकल ला धक्का मारून खाली पाडले व दागीन्याची बॅग घेऊन पळू लागला व त्याच्या साथीदाराच्या मोटार सायकलवर पाठीमागे बसला.कवठे यांनी चोर चोर म्हणून ओरडल्याने जवळच असलेल्या नागरीकांनी धाव घेऊन एका चोराला पकडले तर दुसरा चोर मोटार सायकल सोडून पळून जान्यात यशस्वी झाला आहे.पोलिसांनी मोटार सायकल जप्त केली आहे.पकडलेल्या आरोपीने बॅगमधील ६२ हजार रूपये किमतीचे दागिने काडून त्याच्या जोडीदाराला दिले अशी फिर्याद गणेश कवठे याने दिल्याने आरोपी प्रदिप बंकट शिंदे रा.येडशी ता. जि.उस्मानाबाद व एका अज्ञात चोर असे दोघा विरूद्ध रात्री उशीरा परंडा पोलीस स्टेशनला कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी प्रदिप शिंदे यास दि ५ ऑगष्ट रोजी न्यायालया समोर हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक इज्जपवार यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरिक्षक कवीता मुसळे करीत आहेत.