मगरवाडी ( प्रतिनिधी)पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्राच्या संचालक मंडळाने २०२०-२१ च्या गळीत हंगामात १७ कोटीचा भ्रष्टाचार केला असून त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अभिजित पाटील यांनी केले आहे. 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
2020-21 च्या गळीत हंगामात 3 लाख 3 हजार 547 टन ऊसाचे गाळप होऊन 2 लाख 67 हजार 225 पोती साखर तयार झाली. या साखरेची किंमत 82 कोटी 83 लाख 97 हजार 500 रुपये मिळाले. याची एफ आर पी 62 कोटी 22 लाख 71 हजार 350 रुपये शेतकऱ्यांची देणी होतात. मात्र यातील 30 ते 35 कोटी एफ आर पी थकली आहे.तर मोलेसेल पासून 18 कोटी 40 लाख 72 हजार 500 रुपये उत्पन्न झाले.तर वीज निर्मिती मधून 9 कोटी 84 लाख 34 हजार 440 रुपये मिळले. असे एकूण 111 कोटी 9 लाख 4 हजार 440 रुपये एकूण उत्पन्न मिळाले. तर ऊस बिल , तोडणी वाहतूक, कामगार पगार असे एकूण 93 लाख 95 हजार 76 हजार 900 रुपये देणी लागत आहेत. तरी कारखान्याकडे 17 कोटी 13 लाख 27 हजार 540 रुपये शिल्लक राहतात. ही रक्कम कुठे गेली ? असा खडा सवाल पाटील यांनी विचारलाय.तसेच 2018-19 , 2019-20 आणि 2020-21 या तीन वर्षांत कोणकोणत्या बँकांकडून कर्ज घेतले आणि त्याचा विनियोग कुठं केला याची माहिती त्यांनी विचारली आहे. तसेच 2019- 20 आणि 2020-21 या अहवालानुसार कोणकोणत्या संचालक , त्याचे नातेवाईक यांच्याकडे किती कर्ज आहे याची माहिती द्यावी.
30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत आपल्याला हे मुद्दे मांडताना अडचणी निर्माण केल्या जातील , बोलू दिले जाणार नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केलीय.अभिजीत पाटलांच्या या आरोपांमुळे आता विठ्ठलच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.