केंद्र सरकारने तीन कृषी कायदे तत्वतः रद्द केल्यामुळे जिल्हा काँग्रेस कडून आनंदोत्सव

0
66

 

उस्मानाबाद

केंद्र सरकार मधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे पारित केले होते त्या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्ष गेली १४ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले होते अखेर केंद्र सरकारने हे प्रस्तावित केलेले काळे कायदे तत्वतः मागे घेत असल्याचे जाहीर केले केंद्र सरकार अखेर शेतकरी व विरोधकांच्या आंदोलना समोर झूकले म्हणून उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी उस्मानाबाद च्यावतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून   आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला 

    यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने,कार्याध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव जावेद काझी, ॲड.विश्वजीत शिंदे ॲड.राहुल लोखंडे ॲड.अतुल देशमुख बालाजी नायकल प्रभाकर लोंढे कपील भाई ॲड.गणपती कांबळे अहमद चाऊस यांचेसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here