ढोकी 22 (प्रतिनिधी) – गेल्या चार महिन्यांपासून तेरणाची लिलाव प्रक्रिया चालू आहे. तेरणा च्या मागून तुळजाभवानीचा लिलाव होऊन गोकुळ ग्रुपने चालवण्यास घेतला, मात्र तेरणाची तीन वेळा निविदा निघुनही लिलाव प्रक्रिया अद्यापही झाली नसून उद्या तारीख 25 रोजी लिलाव प्रक्रियेत अदृश्य शक्तीने अडथळा आणल्यास आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,ग्रामपंचायत व विधानसभा, लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकून व अशा अदृश्य शक्तीचा तेरणा सभासद व अवलंबित घटक पूर्णपणे राजकीय अस्तित्व संपवून टाकतील असा इशारा तेरणा च्या गेट वर सोमवार तारीख 22 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेरणा संघर्ष समितीने दिला आहे.
तेरणाचालू व्हावा यासाठी राजकारण विरहित सर्व गटांनी तेरणा बचाव संघर्ष समिती गठित केली नऊ-दहा महिन्या खाली आंदोलन मोर्चा काढून बँक व प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले होते, त्यास यश म्हणून तेरणाची उस्मानाबाद जिल्हा बँकेने कारखान्याकडे असलेल्या सव्वा तीनशे कोटी रुपये थकीत कर्जापोटी निविदा काढली तीन वेळा निविदा निघाली ,भैरवनाथ शुगर ने एकमेव निविदा भरली होती मात्र ती प्रसिद्ध निविदेच्या कमी असल्याने नाकारण्यात आली होती. तेरणा च्या मागून तुळजाभवानीची निविदा प्रक्रिया एकदाच प्रसिद्ध झाली व त्यात गोकुळ ग्रुपला देण्यात आली मात्र तेरणा च्या लागोपाठ तीन वेळा निविदा निघूनही अद्याप ही ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही यात काही अदृष्य शक्ती असल्याचे समजले आहे तेरणा बंद असलेनेया भागाचा अक्षरशः भकास झाला असून 32 हजार सभासद व अवलंबित घटक पूर्णपणे होरपळून निघाला आहे उद्या तारीख 25 रोजी च्या लिलाव प्रक्रियेत बँकेचे संचालक मंडळ व कुण्याही राजकीय मंडळींनी यात आडकाठी आणल्यास व संबंधित मंडळींचा सहभाग आढळून आल्यास त्यांचे राजकीय अस्तित्व 32000 तेरणा चे सभासद त्यांचा परिवार अवलंबित घटक व त्यांचा परिवार संपवल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचा इशारा तेरणाबचाव संघर्ष समितीने या मंडळींना पत्रकार परिषदेतून दिला आहे या पत्रकार परिषदेस सर्व तेरणा संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते सदर पत्रकार परिषद मध्ये दिलेल्या इशाऱ्याने अशा अदृश्य शक्ती कोण असाव्यात याचा शोध तेरणा सभासद घेत असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आले आहे.