आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २०१ रक्तदात्यानी केले रक्तदान
परंडा प्रतिनिधी -मा.आ. राहूल (भैय्या) मोटे यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून आयान- बाणगंगा शुगर युनिट इडा-जवळा यांच्या वतीने कारखाना स्थळी दि. २६ऑगष्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०१रक्तदात्यांनीर क्तदान केले.
आज विज्ञान एवढे पुढे सरसावले आहे की,आपल्याला विज्ञानामुळे बरेच चमत्कार पाहायला मिळत आहेत. पृथ्वीच्या उत्पतीपासून चे वेगवेगळ्या ग्रहापर्यंत आणि समुद्रातल्या तळापर्यत असे विविध बाबी विज्ञानाने शोधून काढल्या आहेत.परंतु अजूनही मानवाला कृत्रीम रक्त तयार करण्यात यश आले नाही हे एक सत्य आव्हान आहे मानवासाठी. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देण लागतो.अन ते पांग फेडण्यासा ठीची संधी म्हणजे रक्तदान होय. सध्याची परिस्थितीचा विचार करून रक्तपेटीमध्ये रक्ताची कमतरता भासू नये म्हणून आयान बाणगंगा कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांच्या मार्गदर्शनाने मा.आ.राहुल (भैय्या) मोटे यांचे वाढदिवसानिमित्त “आयान-बाणगंगा शुगर युनिट इडा-जवळा” येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचा शुभारंभ बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन महादेव (आबा) खैरे,संचालक तात्यासाहेब (भाऊ) गोरे, कारखान्याचे जनरल मॅनेजर मा. संतोष तोडले, मुख्य शेतिधिकरी विठ्ठल मोरे,डिस्लरी मॅनेजर हनुमंत जगताप,चीफ अकौंटंट विशाल सरवदे,सिव्हील इंजिनिअर बंडगर,स्टोअर कीपर नानासाहेब जाधव यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख, विभागप्रमुख यांचे हस्ते संपन्न झाला.
या रक्तदान शिबीराचे योग्य नियोजन कारखान्यातील कर्मचार्यांनी केले होते.ज्या रक्तदात्याने रक्तदान केले आहे. त्या रक्तदात्यास कारखान्याच्या वतीने हेल्मेट वाटप करण्यात आले.यावेळी भगवंत रक्तपेढी, व श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीचे कर्मचारी तसेच कारखान्यातील सर्व विभागाचे खातेप्रमुख, विभागप्रमुख,अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान करून शिबिरात सहभाग नोंदविला.