नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या- वीटभट्टी उद्योग मालक संघटनेची मागणी

0
87

उस्मानाबाद – नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत मिळावी यासाठी उस्मानाबाद जिल्हा विट भट्टी मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनात असे म्हटले आहे की आम्ही जिल्ह्यातील विट निर्माती करणे, लघुउद्योग करत असून यासाठी लागणारा कच्चा माल (दगडी कोळश्याची राख बग्यास, फ्लॅश, मीठ) पाऊसामुळे मातीमोल झाला आहे. यामुळे विटभट्टी मालकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे याच्या चिंतेत आज लघु उद्योजक मानसिक तणावाखाली आहे. तरी या बाबीची शासनाला कळूवन मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मार्फत पंचनामे करुन नुकसान भरपाई शासनाने द्यावी. तसेच रॉयल्टी पासून आम्हाला या वर्षी सुट देण्यात यावी. मुळातच शासकीय नियमानुसार आम्ही ३ फुटाखालचे गौण खनिज उचलत नसून शेतकऱ्यांची तांबडी माती घेवून त्यांना तलावातील काळी माती शेतकऱ्यांना सुपीक जमीन करून देतो. तरी ऊस कामगार कायद्याच्या धरतीवर विटभटटी कामगारांनासुद्ध ऊस कामगार कायद्यामध्ये समाविष्ट करून विटभटटी मालकांचे होणारे नुकसान टाळण्यास शासनाने मदत करावी असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रशांत साळुंखे, उपाध्यक्ष शौकत शेख, सचिव शंकर साळूंके,प्रमोद गायकवाड ,खाजामिया मुलांनी, बापूसाहेब घोंगडे, श्रीनिवास रणदिवे, किशोर बाकले,असलम शेख, हणूमंत खळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here