भीमा कारखान्याच्या कामगारांच्या वतीन चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार

0
80

मगरवाडी (प्रतिनिधी )

मोहोळ तालुक्यातील भीमा सह साखर कारखान्याच्या कामगारांच्या आठ पगारी कामगारांच्या खात्यावर जमा केल्याबद्दल भीमा कामगार संघटनेचे अध्यक्ष बाबा गावडे यांच्या वतीने व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना जगताप म्हणाले की येत्या काळात कामगारांच्या राहिलेल्या पगारी देखील लवकर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सध्या भिमाचा हंगाम जोरात चालू असून कामगार  यापुढे गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी असेच सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले . याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री शिंदे साहेब उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या वेळी सर्व संचालक मंडळाचा व अधिकाऱ्यांचा सत्कार कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला संचालक बिबीशन पवार तुषार चव्हाण दादा शिंदे अनिल गवळी भाऊसाहेब जगताप संघटनेचे अध्यक्ष बाबा गावडे उपाध्यक्ष अशोक पवार महादेव बाबर पतसंस्थेचे चेअरमन संजय पाटील उत्तम भंडारे समाधान पवार मुकुंद गुंड आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तात्या ताठे यांनी केले. तर आभार हरी काळे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here