प्रति हेक्टरी एक लाख रुपयाची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याना मदत द्या शेतकऱ्यांची मागणी
परंडा (भजनदास गुडे ) साऱ्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा असं म्हटलं जातं पण गेल्या पंधरा दिवसापासून हवामानात होत असलेल्या बदल,ढगाळ वातावरण आणि गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. १, २ ,३,४ डिसेंबर या चार दिवसांमध्ये परांडा तालुक्यामध्ये ठिकठीकाणी पाऊस झाला यामध्ये तालुक्याचे नव्हे तर उस्मानाबाद जिल्ह्यातील द्राक्षाचे व बेदाण्याचे माहेरघर अशी ओळख असलेले परंडा तालूक्यातील शिराळा गाव या गावामध्ये जवळपास ६०० ते ७०० एकर क्षेत्राव द्राक्ष बागा असून द्राक्ष बागांचे या अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थीक अडचणीत सापडले आहेत.
या चार दिवसांच्या पावसामुळे ज्या द्राक्ष बागा पोंगा स्टेजमध्ये आहेत,फुलोरा अवस्थेमध्ये आहेत या सर्व बागांना अवकाळी पावसाचा जोराचा फटका बसला आहे.या पावसामुळे द्राक्ष बागेतील घड जिरणे,गळ,कुज, पाकळ्या रिकामे होणे,डाऊनी, भुरी अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव द्राक्षबागेवर झालेला आहे.शिराळा गावातील व आसपासच्या द्राक्ष बागायतदारांचे द्राक्ष पिकांचे अंदाजीत ३० ते५० टक्के नुकसान झाले आहे.याचा फटका जवळपास ३० ते५० टक्के उत्पन्न घटण्याचा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.
महागड्या औषधांची द्राक्षबागावर फवारणी करून आधिच आर्थीक अडणीत आला असताना पून्हा द्राक्षबागेवर बेमोसमी पावसामुळे आलेल्या संकटाचा सामना कसा करावा आणि झालेला खर्च कसा भरून काढावा या चिंतेत आहे. तालुक्यातील अवकाळी पावसामुळे द्राक्षे बागा बरोबरच इतर पिकांनाही बसलेला फटका याची नुकसान भरपाई तातडीने पंचनामे करून द्राक्ष बागांना हेक्टरी ५० हजार ते १ लाख रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी द्राक्ष बागातदार शेतकरी करीत आहेत.
शासनाने त्वरीत प्रशासनास आदेश देशन द्राक्षबागाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन द्राक्ष बागायतदारांना आर्थीक नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
तीन दिवसाच्या बेमोसमी पावसामुळे द्वाक्ष बागेचे गळ,कुज यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.अगोदरच माहागडया औषधाची पवारणी करुन जास्तीचा खर्च झाला असतानाच आता पावसामुळे उत्पान्नाला फटका बसला आहे. या नुकसानीची शासनाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थीक मदत करावी.
स्वप्नील बोबलट,द्राक्ष उत्पादक शेतकरी शिराळा
अवेळी पावसामुळे शिराळा गावातील शेतकऱ्यांच्या द्वाक्ष बांगाचे खुप मोठे नुकसान झाले आहे.शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपया पर्यत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक द्यावी आशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी. शिराळा येथील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे दि ६ डिसेबर रोजी तहसिलदार यांना निवेदन देणार आहोत.
रेवन औदुंबर ढोरे,उपसरपंच,द्राक्ष उत्पादक शेतकरी शिराळा