माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या आरोपाला नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांचे उत्तर
मा.आ.राहूल मोटे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा नगरपरीषदेची सत्ता काबीज करणार – नगराध्यक्ष जाकीर सौदागर
परंडा (भजनदास गुडे )राष्ट्रवादी कॉग्रेसची ताकद बघून शिवसेनेने धसका घेतला असल्यानेच शिवसेना युती आघाडीची भाषा करीत आहे,जर राष्ट्रवादीने विकास कामे केले नाही तर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील युती अघाडी ची भाषा का करीत आहेत असा सवाल करून मा.आ.राहूल मोटे यांच्या नेतृत्वाखाली परंडा नगरपरिषदेची निवडणूक लढवून राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार निवडून आणून पुन्हा नगर परिषदेची सत्ता काबीज करणार असा दावा नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
दि २६ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करन्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे,शहर अध्यक्ष वाजीद दखणी,नगरसेवक सरफराज कुरेशी,संजय घाडगे,बब्बू जिनेरी, शफी पठाण,बच्चन गायकवाड, शरीफ तांबोळी,तनवीर मुजावर, राजकुमार माने,संतोष माळी, किरण डाके यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते .
परंडा नगर परिषदेच्या निवडणूका जाहिर होण्यापूर्वीच परंडा शहरातील राजकारण तापले असुन शिवसेना राष्ट्रवादी मध्ये आरोप प्रत्यारोच्या फैरी झडू लागल्या आहे.
परंडा नगर परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असुन राष्ट्रवादी ने शहरात विकास कामे केली नसल्याने कोणत्या मुद्दयावर मते मागणार असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी दि २५ डिसेंबर रोजी पत्रकारांची बोलताना केला होता .
ज्ञानेश्वर पाटील यांनी केलेल्या आरोपांचे उत्तर देताना नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्ञानेश्वर पाटील १० वर्ष आमदार असताना शहरासाठी कोणते कामे केले दाखवुन दयावे असे आव्हान केले .
राहुल मोटे आमदार असताना शहरातील अनेक ठिकाण च्या स्मशान भुमी,मंदीरा साठी रस्ते अशी अनेक विकास कामे केली असल्याचे सांगीतले आहे.
नगर परिषदेच्या वतीने शहरातील माळी गल्ली,मंडई मुजावर गल्ली अश्या,अनेक ठिकाणी रस्ते,रेवणी भिमनगर, कवठे भिम नगर दलीत वस्ती भागात सुधारना करन्यात आली तसेच रमाई घरकुल योजने अंतर्गत १६५ घरकुले मंजुर करन्यात आली तर ३६ घरकुलुंच्या कामाला वर्क आर्डर दिली तसेच पंतप्रधान अवास योजने अंतर्गत ६६५ घरकुलांना मंजुरी देन्यात आली तर २४७ अवास पुर्ण करण्यात आले आहेत तर दर्गाह व कासीमबाग रस्त्याचे रुंदीकरण व मजबुती करण करन्यात आले आहे पुढील काम निधी अभावी बंदअसुन ते रस्ते पुर्ण करण्यात येतील त्या रस्त्या साठी एक रुपया ही उचलन्यात आलेला नाही अशी माहिती जावीर सौदागर यांनी यावेळी बोलताना दिली .
दोन वर्ष कोरोना मुळे निधी न मिळाल्याने पोलिस ठाणे ते एस.टी स्टॅण्ड रस्त्याचे काम करता आले नाही पुढील काळात सर्व कामे करणार असल्याचे सौदागर यांनी सांगीतले
राष्ट्रवादीने सुडबुध्दीचे राजकारण कधीच केले नाही शिवसेनेची सत्ता असताना शहरातील अनेकांचे दुकाने तोडली जनतेला दिलेला त्रास जनता विसरली नसल्याचे सौदागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले .
राष्ट्रवादी कॉग्रेस नगर परिषद निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने व विकासाच्या मुद्यावर पुर्ण जागा जिंकेल असा दावा नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.