भ्याड हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी
उस्मानाबाद –
समाज कंटकाकडून पोलिस बांधवासह पशूमानक अधिकारी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विविध २५ संघटनांकडून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले असून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शहरातील पोलीसं पथक कत्तल खान्यावर कारवाई करण्यासाठी गेले असता तेथील कसाई यांनी व त्यां माणसांनी पोलीसांवर व गोरक्षकावर हल्ला चढवला त्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी एक पशु मानद कल्याण अधिकारी व अन्य एक असे चार जन गंभीर जखमी झाले पोलीस व पशु मानद अधिकारी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न यावेळी कसाईकडून झाला. वास्तविकतः जन रक्षण करण्यासाठी कटीबद्द असलेल्या व आपले कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना हल्ला होणे ही बाबच मुळात खुप गंभीर आहे. मागील काही दिवसात एका विशिष्ट समाजातील ठराविक लोकांकडून पोलीसांवर हा दुसऱ्यांदा हल्ला केला आहे. मागील हल्ल्यात देखील पोलीस बांधव गंभीर जखमी झाले होते. जनतेचे रक्षण करणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे पोलीस बांधवांवर अशी परिस्थीती आहे. तर सामान्य नागरीक काय होईल याचाही विचार केला गेला पाहिजे. मागील काही दिवसांत शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला सर्व आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा अन्यथा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येत आहे अशीच परस्थिती कायम राहिल्यास शहरात व जिल्हाभरात व्यापक जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्व संघटना दिला आहे.