back to top
Tuesday, December 3, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यापोलीस पीकेट पोस्ट व रात्री ड्रोनद्वारे पॅट्रोलिंग करण्याच्या आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या...

पोलीस पीकेट पोस्ट व रात्री ड्रोनद्वारे पॅट्रोलिंग करण्याच्या आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पोलीस अधीक्षक यांना सूचना

   



 उस्मानाबाद –
शहरात झालेले दरोडे व वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी आज पोलीस अधीक्षक श्रीमती निवा जैन व अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची शहरवासीयांसह भेट घेऊन चर्चा केली. शहरात चोरीच्या घटना सातत्याने घडत असून अनेक भागातील नागरिक दरोड्याच्या भीतीने रात्र – रात्र जागून काढत आहेत. नुकत्याच घटना घडलेल्या कर्मवीर भाऊराव नगर, पोस्ट कॉलनी व गणेशनगर येथील घटनास्थळी भेट देवून आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी वस्तुस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला, व तद्नंतर पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाय योजना सुचवून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

 बायपास रोड लगतच्या परिसरामध्ये अशा घटना वारंवार घडत असून मोक्याच्या ठिकाणी वाहन तपासणी साठी पोलीस पीकेट पोस्ट सुरु करणे, पोलीस पॅट्रोलिंग ची वारंवारता वाढविणे, रात्री कॅमेरा ड्रोन चा वापर सुरू करणे, नगर पालिके मार्फत आवश्यक ठिकाणी दिवे लावून अंधारातील भाग प्रकाशमान करणे आदी सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांना दिल्या. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे त्यांनी मान्य केले असून आजच पोलीस पीकेट पोस्ट व रात्री ड्रोनद्वारे पॅट्रोलिंग सुरु करण्यात येणार आहे. 

मुख्याधिकारी नगरपरिषद यांना शहरातील सर्व पथदिवे सुरू ठेवण्याची काळजी घेण्याचे तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस विभागाच्या सूचनांप्रमाणे नवीन दिवे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चोरट्यांना वेगात जाता येवू नये यासाठी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वरूडा रोडवर स्पीड ब्रेकर बसण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

काही ठरावीक भागातच सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत, त्या भागावर लक्ष केंद्रित करून अशा भागात गस्त वाढविण्याच्या व तपासाची प्रक्रिया वेगाने करून दरोडेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सोमवारच्या दरोडा घटनेतील व्यक्तीचे स्केच काढून प्रसिद्ध करण्याचे सांगण्यात आले आहे. शहरवासीयांनी देखील अधिकची सतर्कता बाळगत पोलीस व पालिका प्रशासनाच्या सहकार्याने सायरन लावण्याच्या सूचना केल्या आहेत. 

शहरातील सीसीटीव्ही बसविण्याचा विषय अनेक वर्षापासून लालफितीच्या कारभारात गुरफटत पडला असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments