उस्मानाबाद – आज सरकारने एस टी कर्मचाऱ्यांना दिलेल्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस. यासाठी विभागीय नियंत्रक कार्यालयात कर्मचारी सुनावणीसाठी येत आहेत मात्र यासोबत काही कर्मचारी ‘टुल्ल’ होऊन येत असल्याने विभागीय नियंत्रक आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना सुरक्षेची आवश्यकता आहे.
आज सकाळी पत्रकार वार्तांकनासाठी गेले असता त्यांना काही कर्मचाऱ्यांमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षेची आवश्यकता आहेच मात्र कोणी कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आहेत का याची तपासणी करण्यासाठी वेगळ्या यंत्रणेची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यातील काही कर्मचाऱ्यांनी मद्य प्राशन केल्याची चर्चा आहे. उस्मानाबाद विभागीय नियंत्रक कार्यालयात तसा गोंधळ होऊ द्यायचा नसेल तर वेळीच खबरदारी घ्यावी लागेल. टल्ली होऊन येणारे आणि ज्यांना गोंधळ घालायचा आहे अश्या कर्मचाऱ्यांबाबत दैनिक जनमत ने विभाग नियंत्रकांना कळवले आहे. पोलीस प्रशासनाने देखील याची काळजी घ्यावी यासाठी आहे ‘वृत्तप्रपंच’.