वाशी (ता. प्रतिनिधी) – मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या आदेशान्वये वाशी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तहसील कार्यालय वाशी येथे पार पडलेल्या या प्रक्रियेनंतर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींसाठी आरक्षणाचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, यात सामाजिक न्याय आणि समावेशक प्रतिनिधित्वाचे भान ठेवण्यात आले आहे.
आरक्षणानुसार अनुसूचित जातीसाठी ६, अनुसूचित जमातीसाठी २, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी ११, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी २२ सरपंच पदे निश्चित करण्यात आली आहेत. विशेषतः महिलांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी विविध प्रवर्गांमधून महिलांसाठी आरक्षित पदांची संख्या महत्त्वाची ठरली आहे.
अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती: सटवाईवाडी, सेलू, दहिफळ/शेलगांव
अनुसूचित जाती (सामान्य) प्रवर्गासाठी: मसोबाचीवाडी, डोंगरेवाडी, फक्राबाद
अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी: झिन्नर
अनुसूचित जमाती (सामान्य) प्रवर्गासाठी: कन्हेरी
नागरिकांच्या मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी: पिंपळगांव (क), नांदगांव, तेरखेडा, पिंपळवाडी, बावी, सोनेगांव
नागरिकांच्या मागासवर्ग (सामान्य) प्रवर्गासाठी: रूई/लोणखस, जवळका, घाटपिंपरी, सरमकुंडी, पार्डी
सर्वसाधारण प्रवर्गासाठी (पुरुष): गोजवाडा, हातोला, विजोरा, खामकरवाडी, लाखनगाव, पारा, पिंपळगांव लिंगी, सारोळा मां, तांदुळवाडी, गोलेगांव, कडकनाथवाडी
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी: दसमेगांव, घोडकी, मांडवा, सारोळा (वा), वडजी, पांगरी, पारगांव, इंदापूर, शेंडी, खानापूर, सोनारवाडी
या आरक्षण प्रक्रियेची अधिकृत घोषणा तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी केली. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही आरक्षण सोडत महत्त्वाची ठरत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी ही प्रक्रिया उपयुक्त ठरणार आहे.
- धाराशिव-सोलापूर रेल्वे प्रकल्पाचा खर्च 900 कोटींवरून 3000 कोटींवर दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती
- मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ, पायाभूत प्रकल्पांना गती
- धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र: सकल मराठा समाजाची लवकरच जिल्हा बंदची हाक, मुंबईला जाणारा दूध-भाजीपाला बंद करण्याचा इशारा
- येडशी बसस्थानक वगळून जाणाऱ्या एसटी बसला चाप: ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनंतर चालक-वाहकावर कारवाई
- मराठा समाजाच्या कल्याणासाठी फडणवीस-शिंदेंचे सर्वाधिक योगदान : नरेंद्र पाटील