अपघातात ३०/३५ प्रवाशी जखमी,जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
परंडा ( प्रतिनिधी ) बार्शी /परंडा राज्य मार्गावरील सोनगीरी नदी लगतच्या वळणावर परंडा आगाराची एस.टी बस रस्त्याच्या खाली गेल्याने बस पलटी होऊन झालेल्या अपघाता ३० ते ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. हि घटना दि ३ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमीना परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले असुन चार ते पाच प्रवाश्यांचे हात,पाय फॅक्चर झाले असल्याची माहिती मिळली आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपजिल्हा रूग्णालयात गर्दी केली होतीया अपघाता मध्ये दत्तात्रय वेताळ, चंद्रभागा वेताळ,नुसरत काझी,मंगल बोराडे,समीना पठाण,तमन्ना पठाण, विश्वनाथ पाडूळे,आफरीन डोंगरे,सहेर सय्यद,अजिनाथ मुळीक,कैलास लांडगे,बाळासाहेब कानगुडे, हारून बेसकर,मेहराज बेसकर, संतोष व्हटकर,सतीस पसारे, अन्नासाहेब काकडे,बाळू काशीद कैलास लांडगे,साक्षी पाटील, शांताबाई पाटील,कमलाबाई पवार,जुबेदा मुंडे,सोमनाथ गायकवाड,लताबाई गुडे,संगीता धुमाळ,नंदाबाई वाडेकर,सरस्वती जाधव,रमेश जाधव,शिवकन्या दुबवड,दौलतराव नलवडे यांच्या ईतर प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात चार ते पाच प्रवासी फॅक्चर झाले असल्याची माहिती मिळाली असुन त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात येत आहे.अपघाताची माहिती मिळताच परंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार केरबा कांबळे,पो.ना क्षिरसागर,पो.ना शेवाळे,पो.ना अफरोज शेख,पोह म्हेत्रे,पोकॉ यादव यांच्यासह सोनगीरी,खासगाव,पिंपळवाडी येथील नागरीकानी अपघातातील प्रवाश्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवीण्यासाठी मदत केली.यावेळी अगार प्रमुख उल्हास शिंनगारे यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.