कामावर रुजू करून घ्या या मागणीसाठी कोव्हिड १९ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण

0
101


उस्मानाबाद – कामावर रुजू करून घ्या या मागणीसाठी कोव्हिड १९ कंत्राटी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनात असे म्हटले आहे की कोविडच्या काळात जीवाची पर्वा न करता सेवा दिली आहे जिल्हा रूग्णालय यांच्याकडून जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर या तीन महिन्यांचा कामाचा मोबदला दिला नाही दिवाळीच्या तोंडावर तीन ते चार महिन्यांचा मोबदला न देता कामावरून कमी केले आहे त्यांना तात्काळ कामावर रुजू करावे.जीवाची पर्वा न मनोभावे सेवा केली आहे.


कुटुंबातील सदस्यांची पर्वा केली नाही.भविष्यात आमच्या रोजगाराचा प्रश्न मिटेल ते कर्तव्य निभावली.वेळेवर पेगार नाही निष्कर्ष जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामध्ये आमची अवस्था.अचानक पद मुक्त केल्यामुळे जगावे कसे असा प्रश्न असे विविध प्रश्न मांडले या निवेदनावर रोहित पांढरे, रणजीत ढवळे,मोहन शिंदे, तुकाराम मोरे,निखील बाहुबळ,सौरभ माळी,रहिम पटेल, अजिंक्य कांबळे, रविंद्र लोंढे, आण्णासाहेब ढोबळे, जगदीश बेंद्रे,सोहम पेठे, संदिप जाधव,अजित पवार , आकाश खंडागळे,अक्षय लांडगे, कृष्णा कुंभार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here