धाराशिव जिल्ह्याची राजकीय राजधानी असणाऱ्या तेर मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत रंगत येणार असून गावगाडा विरुद्ध राजवाडा अशी ही लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सक्षणा सलगर यांनी या नावाची चर्चा आहे दोघीही उच्चशिक्षित असून इंजिनीयर विरुद्ध इंजिनियर अशी तर लढत असणार आहे मात्र यापेक्षा गावगाडा विरुद्ध राजवाडा अशी ही निवडणूक होईल असा अंदाज वर्तवला जात आहे सक्षणा सलगर यांना अद्याप तिकीट मिळाल्याचे जाहीर झाले नसले तरी त्यांचे समर्थक त्यांना तेरमधून तिकीट मिळेल अशी आशा व्यक्त करत आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला या पदासाठी आरक्षित असल्याने अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली जाईल असे बोलले जात आहे मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे तसेच त्यांचे पती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही विधानसभा निवडणूक लढवली आहे घराणेशही चा विरोध करणारा भारतीय जनता पक्ष पुन्हा पाटील परिवारामध्ये उमेदवारी देईल का हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी अर्चना पाटील समर्थकांकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल असे बोलले जात आहे.
गावगाडा विरुद्ध राजवाडा रंगत!
सक्षणा सलगर या सामान्य घरातून राजकारणात आलेले आहेत तर अर्चना पाटील ह्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या सून असून त्यांच्या घराण्याची जिल्ह्यावर सत्ता राहिलेली आहे. ऐतिहासिक भूमी असलेले तेर विकासाच्या दृष्टीने मागासलेले असल्याने विकासाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा ठरणार आहे.
महाविकास आघाडी मजबूत?
तेर जिल्हा परिषद गटामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने तेर मध्ये महाविकास आघाडी मजबूत असल्याचे चित्र आहे. येत्या निवडणुकीत चित्र कसे असेल हे मतदार ठरवतील.
- राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून माल लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक
- जिल्हा परिषदेच्या पुरस्कार वितरणात राजकारण;निकष पूर्ण न करणाऱ्यांचा गौरव
- पारगावात अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश हॉटेल पृथ्वीराज लॉजवर छापा; दोन पीडित मुलींची सुटका
- राजकीय राजधानीत गावगाडा विरुद्ध राजवाडा रंगत रंगणार, इंजिनियर विरुद्ध इंजिनियर उभारणार
- राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी
